अंबादास दानवे यांच्याकडून सभागृहात शिवीगाळ

दानवेंच्या राजीनाम्याची मागणी, प्रसाद लाड यांना दिल्या शिव्या

अंबादास दानवे यांच्याकडून सभागृहात शिवीगाळ

संजय राऊत यांच्याकडून अनेकवेळा पत्रकार परिषदांत शिव्यांचा वापर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आता उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेदेखील राऊत यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. त्यांनी चक्क विधान परिषद सभागृहातच शिव्यांचा वापर केला. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना त्यांनी शिव्या दिल्या आणि त्यानंतर सभागृहात आणि सभागृहाबाहेर गोंधळ माजला.

संसदेत राहुल गांधी यांनी हिंदू धर्मावरून केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा अंबादास दानवे याबाबत आपली भूमिका मांडत असताना गोंधळ झाला. तेव्हा प्रसाद लाड त्यांच्याकडे पाहून हातवारे करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला. शिवाय, तेही अंगावर धावून गेले आणि त्यावेळी त्यांनी शिव्या दिल्या.

हे ही वाचा:

भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर लोणावळ्यात संध्याकाळी ६ नंतर पर्यटकांना बंदी

मेधा पाटकर यांना ५ महिन्यांचा तुरुंगवास, १० लाखांचा दंड

“दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित”

स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी नवा कायदा करणार

दानवे म्हणाले की, हा माझा मुद्दा आहे. जे लोकसभेत झालेले आहे ते त्यांचे असेल. त्यांचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का? त्याचवेळी सत्ताधारी आमदारांनी आरडाओरडा केला. तेव्हा दानवे यांचा संयम सुटला आणि त्यांनी अर्वाच्य भाषा वापरली.

प्रसाद लाड यासंदर्भात म्हणाले की, राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदूंबद्दल अभद्र भाषा वापरली. हिंदूंचा अपमान सहन केला जाणार नाही. आमचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी हा विषय सभागृहात ठेवला. महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी तेव्हा गोंधळ घातला. त्यानंतर सभागृह तहकूब झाले. पण पुन्हा दरेकर यांनी हा विषय मांडला. मी याच विषयावर निषेधाचा ठराव करून लोकसभेत पाठविण्याची मागणी केली होती. तेव्हाच दानवे यांनी मला शिवीगाळ केली. सभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीतच त्यांनी आईबहिणीवरून शिव्या दिल्या.

Exit mobile version