25 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणअमितभाईंकडे काही गोष्टी गेल्या की, अनेकांना कापरे भरते

अमितभाईंकडे काही गोष्टी गेल्या की, अनेकांना कापरे भरते

Google News Follow

Related

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे उद्गार

केंद्रात सहकार खाते नव्हते, तर म्हणायचे केंद्र सरकार सहकाराला मारतं आहे. आता ७० वर्षांनी पहिल्यांदा सहकार खाते तयार झाले, तर म्हणतात की, सहकाराचा केंद्राशी काय संबंध? अशा शब्दांत सामनाच्या अग्रलेखातील उल्लेखावर सणसणीत टोला लगावत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अमितभाईंकडे काही गोष्टी गेल्यावर काहींना कापरे भरते, पण त्याला पर्याय नाही. खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. केंद्रीय मंत्री अमितभाई शाह राजकारणात येण्यापूर्वीपासून सहकारात होते. गुजरातमध्ये सहकारात त्यांनी केलेले काम अतिशय मोठे आहे. त्यांना या क्षेत्रातले सगळे माहीत आहे. त्यामुळे स्वाभाविकच हे खाते त्यांच्याकडे गेले, असेही फडणवीस म्हणाले. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याचाही भार देण्यात आला आहे. त्यावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी उपरोक्त टिप्पणी केली.

पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर आपली स्पष्ट मते मांडली.
दोन दिवसांच्या अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यावर बोलताना ते म्हणाले की, राज्यात नुकतेच अधिवेशन पार पडले. ज्या पद्धतीने सत्तारुढ पक्षाच्या वतीने एकतर्फी कारभार चालविण्यात आला. अतिशय कपोलकल्पित आरोप लावले गेले. मी अतिशय जबाबदारीने सांगतो, भाजपाच्या एकाही आमदाराने पीठासीन अध्यक्षांना शिवी दिलेली नाही. शिवी कुणी दिली, हे मी योग्यवेळी सांगीन.

१२ आमदारांना एकप्रकारे कुभांड रचून एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. यातून सत्तापक्षाच्या मानसिकतेचे दर्शन होते आहे. ओबीसीच्या प्रश्नावर सत्तारुढ पार्टी उघडी पडली आहे. मी सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटसह सांगितले की, त्यांनी सांगितले आहे राज्य मागासवर्ग स्थापन करा. पण हे सरकार एखादी गोष्ट अंगावर येते आहे हे कळल्यावर ती केंद्रावर ढकलण्याचे काम करते. त्यातून आमच्या आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढाई सुरू राहील, असेही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

बना संरक्षण तंत्रज्ञानातले ‘मास्टर’

संजय राऊतांची मते वैयक्तिक स्वरूपाची…भाजपाने मला संपवायचा प्रश्नच नाही

मोदींनी केला २०२४ चा शंखनाद

रझा अकादमीचा जनाबसेनेला दम…मोहम्मद पैगंबर कायदा आणण्यासाठी दबाव

ओबीसी प्रश्नावर सरकारचा ‘टाइमपास’
फडणवीस यांनी सांगितले की, इम्पिरिकलचा सेन्ससशी काय संबंध आहे? या सरकारला फेब्रुवारीत तीन चतुर्थांश निवडणुका व्हायच्या आहेत हे लक्षात घेऊन त्यांना टाइमपास करायचा आहे. तिथपर्यंत आरक्षण मिळाले नाही आणि नंतर मिळाले तर पुढील सात वर्षे काही कामाचे नाही.

स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येबाबत ते म्हणाले की, त्याची आत्महत्या सर्वांना चटका लावून गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ३१जुलैपर्यंत एमपीएससीच्या जागा भरतो. नंतर म्हणाले की, एमपीएससीच्या सदस्यांच्या जागा भरतो. त्यामुळे सरकार या प्रश्नावर गंभीर आहे असे वाटत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने एमपीएससीबाबत गांभीर्याने पावले उचलावीत.

हरी नरके यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात टीका केली होती, त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ओबीसी आरक्षणासंदर्भात १३ डिसेंबर २०१९ ते ४ मार्च २०२१ या संपूर्ण कालावधीत राज्य सरकारने काय कारवाई केली, हा प्रश्न त्यांना कुणी विचारला का? कुणी कसेही वागले तरी विचारवंतांवर आम्ही टीका करीत नाही, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली.

फडणवीस यांनी आत्मविश्वास व्यक्त केला की, इम्पिरिकल डेटा गोळा करणे हे ४ महिन्यांचे काम. हे काम सहज होऊ शकणारे आहे. मी हेच म्हटले की, जर तुम्हाला जमत नसेल तर मला सूत्र द्या, मी करून दाखवितो. आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो.

पंकजा मुंडे यांच्या कथित नाराजीसंदर्भातही फडणवीस यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, मी असो की डॉ. भागवत कराड, आम्ही दोघेही मुंडे साहेबांमुळे तयार झालेले कार्यकर्ते. पंकजाताईंनी मांडलेली भूमिका हीच भाजपाची भूमिका आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वत: हीच आमची सर्वांची कार्यपद्धती आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा