पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवार(२६ मे) उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.यावेळी पंतप्रधान मोदींनी मिर्झापूर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींनी इंडी आघाडीचे वर्णन जातीयवादी असे केले.तसेच मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी विरोधकांनी संविधान बदलण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला.
पंतप्रधान मोदींनी रविवारी मिर्झापूरच्या मदिहान रोडवरील बरकछा कलान येथे लोकसभा उमेदवाराच्या समर्थनार्थ रॅली काढली.यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, समाजवादी पक्ष (एसपी) – काँग्रेस पक्ष व्होट बँकेसाठी समर्पित आहेत, तर मोदी मागासलेल्या आणि गरिबांच्या हक्कांसाठी समर्पित आहे.ते पुढे म्हणाले की, देशातील जनतेने ‘इंडी आघाडी’ला ओळखले आहे.हे लोक कट्टर जातीयवादी आणि कुटुंबवादी आहेत.जेव्हाही यांचे सरकार बनेल तेव्हा हे याच आधारावर निर्णय घेतील.
हे ही वाचा:
डोंबिवली स्फोटप्रकरणातील शोध थांबला, तीन कामगार अद्याप बेपत्ता!
शिक्षिकेचा आवाज काढून सात विद्यार्थिनींवर बलात्कार
ईव्हीएमवर भाजपचा टॅग असल्याचा तृणमूलचा दावा फुसका!
भावेश भिंडेला २९ मे पर्यंत पोलीस कोठडी!
पंतप्रधान म्हणाले की, निवडणुकीच्या सहा टप्प्यांनंतर देशात तिसऱ्यांदा भाजप-एनडीएचे मजबूत सरकार बनण्याची खात्री झाली आहे. भारताने तिसऱ्यांदा मोदी सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचे कारण म्हणजे चांगले हेतू, चांगली धोरणे, राष्ट्र प्रथम आणि राष्ट्रावरील निष्ठा.
ते पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशातील लोक राजकारण समजण्यात खूप निष्णात आहेत, येथील खेड्यातील मुलालाही राजकारण समजते.कोणी समंजस व्यक्ती कधीही बुडत्या कंपनीचे शेअर्स विकत घेणार नाही.जो बुडत आहे, त्याला कोणी मतदान करेल का?, कारण त्याला माहित आहे की, हे बुडणार आहेत मग त्यांना कोण मतदान करेल.सामान्य माणूस त्यालाच मतदान करेल, ज्याचे सरकार बनेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.