27 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणअहो आश्चर्य! मोदीविरोधक शेहला म्हणते, काश्मीरमध्ये होताहेत सुधारणा

अहो आश्चर्य! मोदीविरोधक शेहला म्हणते, काश्मीरमध्ये होताहेत सुधारणा

जेएनयूच्या माजी विद्यार्थिनीने केले ट्विट

Google News Follow

Related

सरकारची विरोधक म्हणून ओळखल्या जाणारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयू) माजी विद्यार्थीनी शेहला रशीद हिने मोदी सरकारवर स्तुतिसुमने उधळली आहेत. तिने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. काश्मीरमधील मानवाधिकारांच्या बाबतीत रेकॉर्ड सुधारल्याचे शेहला हिने ट्वीट करत मान्य केले आहे. जम्मू-काश्मिरमधून कलम ३७० हटवल्यानंतर झालेले सकारात्मक बदल दिसत असून सरकारची विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेहला रशीद हिला सुद्धा ते मान्य करावे लागले.

शेहलाने स्वातंत्र्यदिनाला ट्विट करत केंद्र सरकारने काश्मिरात सुधारणा घडवून आणल्याचे मान्य केले आहे. शेहला रशीद ही उमर खालिद आणि कन्हैया कुमार यांच्याबरोबर “भारत तेरे तुकडे होंगे” अशा घोषणा देण्यात आघाडीवर होती. तिच्याविरुद्ध सध्या केस सुरू आहेच.

जम्मू काश्मीरमध्ये यंदाचा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. लाखो काश्मिरी तरुण-तरुणींनी उत्साहाने यात सहभाग नोंदविला. त्यासोबतच दहशतवाद्यांच्या नातेवाईकांनी देखील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांमध्ये उत्साहात सहभाग घेतला. हे वातावरण पाहून जेएनयूची माजी विद्यार्थी शेहला रशीद हिने देखील हे सकारात्मक बदल अधोरेखित केलेत.

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी जावेद मट्टू याचा भाऊ रईस मट्टू याने सोपोर मधील आपल्या दुकानावर तिरंगा फडकवला. काश्मीरमध्ये विकास होतो आहे. इथे शांतता नांदते आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी पर्यंत स्वातंत्र्य दिनाच्या आसपास दुकान बंद ठेवायला लागायचे. पण आता ती परिस्थिती उरलेली नाही. त्यामुळे आपण खुश आहोत, असे रईस मट्टूने जाहीरपणे सांगितले होते. या संदर्भातला त्याचा व्हिडिओ शेहला रशीदने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

आपल्या ट्विटमध्ये शेहला म्हणाली की, “अनेकांना हे गैरसोयीचे वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे की जम्मू-काश्मीर मधले मानवी हक्का संदर्भातले काश्मीर मधले रेकॉर्ड मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आणि तिथल्या प्रशासनाच्या निगराणीत सुधारले आहे. त्यामुळे हजारो जणांचे प्राण वाचू शकले आहेत. हे माझे निरीक्षण आहे” असे मत तिने ट्विटमध्ये नोंदविले आहे. 

हे ही वाचा:

विनयभंग प्रकरणी स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ लोमटेला अटक !

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणाला मारहाण

चांद्रयानाचा चंद्राच्या शेवटच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची राम कथेला हजेरी

शेहला रशीद ही जम्मू-काश्मीरची आहे. शेहला जेएनयू विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्ष राहिली असून फेब्रुवारी २०१६ मध्ये, जेएनयू विद्यार्थी संघटनेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमार आणि उमर खालिद यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली तेव्हा शेहलाने जोरदार विरोध केला होता. शेहला यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यास कडाडून विरोध केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा