“विरोधक पुढील निवडणुकीनंतर दर्शक गॅलरीत दिसतील”

पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला खरपूस समाचार

“विरोधक पुढील निवडणुकीनंतर दर्शक गॅलरीत दिसतील”

अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांच्या भाषणावरुन ते यानंतरही विरोधकच राहतील असं दिसतंय आणि विरोधक पुढील निवडणुकीनंतर दर्शक गॅलरीत दिसतील, असा खोचक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला आहे.

विरोधकांची उमेद घालवण्याचे काम काँग्रेसने केले

विरोधी पक्षावर तोफ डागताना नरेंद्र मोदी म्हणाले की, “विरोधी पक्षाची जी अवस्था झाली आहे त्याला सर्वाधिक कोण जबाबदार असेल तर काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसला दहा वर्षात विरोधी पक्ष म्हणूनही मोठं होता आलं नाही. विरोधात इतरही तेजस्वी लोक आहेत. मात्र, त्यांची उमेद घालवण्याचं कामही काँग्रेसने केले. तरुण पिढीला पुढे जाऊ दिलं नाही. काँग्रेसने विरोधी पक्षाचं, स्वतःचं, संसदेचं आणि देशाचं खूप मोठं नुकसान केलं आहे. देशाला खूप चांगल्या विरोधी पक्षाची गरज आहे,” अशी सणसणीत टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

काँग्रेसकडून एकच प्रॉडक्ट वारंवार लाँच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवरही भाष्य केले आहे. देशाने घराणेशाहीची खूप मोठी किंमत मोजली आहे आणि काँग्रेसलाही ती किंमत मोजावी लागली. अधीररंजन चौधरींची अवस्था आज समोर आले. गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेसला राम राम केले. मल्लिकार्जुन खर्गे लोकसभेतून राज्यसभेत गेले. एकच प्रॉडक्ट वारंवार लाँच केल्याने काँग्रेसच्या दुकानाला कुलुप लागायची वेळ आली आहे. दुकान आम्ही म्हणत नसून काँग्रेसचे लोक स्वतःच म्हणत आहेत. असा खोचक टोला नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला.

घराणेशाही लोकशाहीत योग्य नाही

“घराणेशाहीची चर्चा होते कारण हा पक्ष कुटुंब चालवतं, कुटुंबातल्या लोकांनाच प्राधान्य देतं. कुटुंबच सगळे निर्णय घेतं त्याला घराणेशाही म्हणतो. लोकशाहीत हे योग्य नाही. राजकारणात एका कुटुंबातले दहा लोक आले तरीही काहीच प्रश्न नाही. पण ते त्यांच्या प्रतिभेवर आणि लोकांनी दिलेल्या मतांवर निवडून आलेले हवेत लादलेले नकोत,” असा तिखट सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला सुनावला.

हे ही वाचा..

१९९१ चा उपासना कायदा रद्द करण्याची मागणी

पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळं फासल्या प्रकरणी कुणाल राऊतला अटक!

घाटकोपरमध्ये दगडफेक, मुफ्तीच्या द्वेषपूर्ण भाषणप्रकरणी पाच जण ताब्यात!

कोकण दौऱ्यात उद्धव ठाकरेंचा संताप, संताप आणि संताप

काँग्रेसमध्ये कॅन्सल कल्चर

“काँग्रेस हा एका कुटुंबातच गुरफटून गेलेला पक्ष आहे. लोकांच्या आशा-अपेक्षा काय आहेत याच्याशी त्यांना काहीही देणं नाही. काँग्रेसमध्ये कॅन्सल कल्चर निर्माण झालं आहे. ‘मेक इन इंडिया’ म्हटलं की काँग्रेस म्हणतं कॅन्सल. ‘आत्मनिर्भर भारत’ म्हटलं की काँग्रेस म्हणतं कॅन्सल. नवं संसद भवन म्हटलं की काँग्रेस म्हणतं कॅन्सल. या सगळ्या गोष्टी मोदींनी उभ्या केलेल्या नाहीत या देशाच्या आहेत,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

Exit mobile version