“विरोधकांनी टीका करण्यापेक्षा निर्णय चुकीचा कसा हे दाखवावे”

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातील निर्णयानंतर होणाऱ्या टीकेवर राहुल नार्वेकरांनी विरोधकांना सुनावले

“विरोधकांनी टीका करण्यापेक्षा निर्णय चुकीचा कसा हे दाखवावे”

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासंदर्भात निर्णय दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे नेते आणि शरद पवार गटाचे नेते राहुल नार्वेकर यांना लक्ष्य करून त्यांच्यावर टीका करत आहेत. विरोधकांना राहुल नार्वेकर यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. समोर असलेल्या पुराव्यावरुन निर्णय घेतला असून कायदेशीर आहे. त्यामुळे टीका करण्यापेक्षा निर्णयातील चुका दाखवा, असे आव्हान देत राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे की, “एखाद्या संस्थेने आपल्या विरोधात निर्णय दिला तर त्यावर टीका करायची, अशी त्यांची कायमची भूमिका आहे. संस्थेने त्यांच्या बाजूने निर्णय दिला तर सत्याचा विजय झाल्याचे सांगत आनंद साजरा करतात. ते सातत्याने निर्णयावर टीका करत आहेत. परंतु, घेतलेला निर्णय कायदेशीर असून विरोधकांनी टीका करण्यापेक्षा माझा निर्णय चुकीचा कसा हे दाखवावे,” असे थेट आव्हान राहुल नार्वेकर यांनी दिले आहे.

हे ही वाचा:

भारत-चीन सीमाभागात बर्फात अडकलेल्या ५०० जणांची सुटका

शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित; किमान आधारभूत किमतीची मागणी चुकीची

लुडो गेम खेळण्यातून सहकाऱ्याची हत्या करून आरोपीची आत्महत्या!

बिहारमध्ये १५ जणांना नेणाऱ्या रिक्षाला अपघात; ९ ठार!

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संबंधी निर्णय दिला. यावेळी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आले. परंतु, राहुल नार्वेकर यांनी शरद पवार गटातील आमदारांना अपात्र ठरवले नाही. त्यामुळे अजित पवार गटाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस दिली आहे. या याचिकेवर आता १४ मार्चला सुनावणी होणार असून राहुल नार्वेकर यांना या निर्णयाबाबत खुलासा द्यावा लागणार आहे.

Exit mobile version