शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पोटात काल अचानक दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर रात्रीच तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना पित्ताशयात खडे झाल्याने हा त्रास उद्भवल्याचे समजले होते. शस्त्रक्रियेनंतर हे खडे काढून टाकण्यात आले.

शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. शस्त्रक्रियेनंतर शरद पवार यांची प्रकृती चांगली आहे. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्यांच्या पित्ताशयामध्ये झालेले खडे काढून टाकण्यात आले आहेत अशी माहितीही यावेळी टोपे यांनी बोलताना दिली होती.

हे ही वाचा:

महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक… मुंबईत मिळत नाहीयेत रुग्णालयात खाटा, तर नागपपूरात ऑक्सिजनची कमतरता

परमबीर यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन

शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी देखील माहिती दिली. ते म्हणाले की, काही चाचण्या केल्यानंतर शरद पवार यांच्या प्रकृतीच्याबाबत काही समस्या आम्हाला दिसून आल्या होत्या. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर अमित मायदेव यांनी दिली.

दरम्यान शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महाराष्ट्रातील सर्व नेत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्याबरोबरच त्यांच्या शस्त्रक्रियेनंतर शरद त्यांना दहा दिवस रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. पवार यांना त्रास झाल्याने आधी त्यांना ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते, परंतु अचानक त्रास वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

Exit mobile version