सध्या आपल्याला आरोग्य मंदिराची आवश्यकता आहे. धार्मिक स्थळं सगळ्यांना उघडावीत असे वाटते आहे, पण आपण ती टप्प्याटप्प्याने उघडणार आहोत, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्यास अजूनही सरकारची तयारी नसल्याचे सांगितले.
मंदिरे उघडण्यासाठी मध्यंतरीच्या काळात आंदोलने झाली. विशेषतः सणासुदीच्या दिवसांत मंदिरे उघडावीत, निर्बंधांसहित मंदिरे उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पुढे येत होती. पण सरकारने त्यासंदर्भात कोणतीही अनुकूल भूमिका घेतली नाही. अजूनही सरकारचे तेच धोरण असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसून आले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विविध उपक्रमांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी व्हर्च्युअल बैठकीत कल्याण डोंबिवलीकरांना हवं ते सगळं देऊ अशी घोषणाही केली. कल्याण डोंबिवलीतल्या जनतेला लवकरच रस्ते, पूल, हॉस्पिटल्स मिळणार अशी टाळीबाज घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
लोक आपल्याला मतं का देतात, तर त्यांची वैयक्तिक नव्हे तर सोयीसुविधांची कामं पूर्ण व्हावीत म्हणून. ते आपल्या उमेदवारांना म्हणूनच निवडतात. तेव्हा कल्याण डोंबिवलीतील लोकांना काय हवं ते दिलं. मी वचन देतो. जे जे हवं ते रस्ते, हॉस्पिटल, पूल, जनतेच्या हितासाठी ते केल्याशिवाय राहणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पाऊलही टाकले.
‘आधी चोऱ्या करायच्या आणि नंतर बहाणे करायचे’ दरेकरांचा मालिकांवर पलटवार
…म्हणून कोहली आणि रवी शास्त्रींवर बीसीसीआय नाराज!
ठाण्यात फेरीवाल्यांच्या टोळ्या सक्रीय
शिवाजी पार्कमधील पुत्रंजीवाच्या झाडाचा घेतला जीव
कोरोनाच्या नियमांसंदर्भात आपणच जबाबदारी पाळली नाही तर जनता काय करेल. भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देतो. हिंदुत्वाचे रक्षण करणारी शिवसेना आहे हे १९९२-९३ला दाखवून दिले आहे. आरोग्यव्यवस्थेशिवाय भारतमातेची मुलं रडत असतील तर भारत माता काय म्हणेल. जयघोष करत राहाल तर काय होईल. सोयीसुविधांकडे लक्ष द्या. त्यांना बरं कसं करायचं हे पाहा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.