यावेळी मुंबईचा महापौर भाजपचाच होणार. मुंबई शहराचा विकास करायचा असेल तर भाजपला सत्तेत आणावे लागेल. जनतेला खड्डेमुक्त रस्ता भाजपच देऊ शकतो. असे भाजपचे उत्तर भारतीय आमदार राजहंस सिंह एका मुंबईमधील कार्यक्रमामध्ये बोलले.
माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी आरे कॉलनी, गोरेगाव येथे भाजपच्या वतीने बाटी-चोखा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमादरम्यान राजहंस सिंह बोलत होते. शहराचा विकास फक्त भाजपच करू शकतो. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा ते मध्यरात्रीसुद्धा मुंबई मेट्रोच्या कामाची पाहणी करत होते. त्यामुळे मेट्रोला गती मिळाली होती, मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून मेट्रोचे काम रखडले आहे. जेवढे काम फडणवीसजी करून गेले त्याच्यापुढे काम गेलेले नाही. आपण प्रगती करू शकलेलो नाही. असेही ते म्हणले.
मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय समाजाने भाजपला मतदान करून भाजपचा महापौर बनवावा. मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर आणण्यासाठी सर्व उत्तर भारतीयांनी सहकार्य करावे. कारण आम्हा सर्व उत्तर भारतीय समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आदर, सन्मान आणि सुरक्षा दिली आहे. मुंबई शहराच्या प्रगतीला सर्व समाजाचे योगदान आहे. यामध्ये उत्तर भारतीयांचाही मोठा वाटा आहे. आज मुंबई ही आपल्या सर्वांची कर्मभूमी आहे. त्यावेळी सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास” या घोषवाक्याचीही जनतेला आठवण करून दिली.
हे ही वाचा:
परमबीर सिंह वसुली प्रकरणात सॉफ्टवेअरमध्ये ‘छोटा शकील’
पुन्हा एकदा लघुग्रह पृथ्वीकडे झेपावला!
अर्थसंकल्पाविषयीचा हा इतिहास माहित आहे का? येथे वाचा सविस्तर
उद्धवजी, राऊत यांच्या वक्तव्यांना आपली संमती आहे काय?
योगीजींच्याच हाती पुन्हा सत्ता द्या
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारचे कौतुक करताना राजहंस सिंह म्हणाले की, जेव्हापासून योगीजी युपीमध्ये नेतृत्व करत आहेत अवघ्या ५ वर्षांत युपीची खूप प्रगती झाली आहे. तसेच युपी निवडणुकीवेळी मुंबईतील युपी जनतेला यूपीला जाता येत नसेल, तर निदान तिथे राहणाऱ्या ओळखीच्या, नातेवाईक, कुटुंबीयांना फोन करून भाजपच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करा. ज्यामुळे पुन्हा युपीमध्ये भाजपची सत्ता येईल आणि युपीचा विकास होईल.
या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे आयोजक मुरजी पटेल, मुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय, ज्येष्ठ नगरसेवक कमलेश यादव, माजी नगरसेवक सुरेंद्र दुबे, मंडळ अध्यक्ष अशोक पांडे यांच्यासह मोठ्या संख्येने उत्तर भारतीय उपस्थित होते.