कधीकाळी देशात प्रमुख विरोधी पक्ष राहिलेल्या माकपला आता स्वतःचे अस्तित्व टिकवणे कठीण झाले आहे. आघाडीमध्ये असूनही डाव्या पक्षांनी केवळ आठ जागांवर विजय मिळवला आहे. इतकेच नव्हे तर, त्यांचा पारंपरिक गड असणारे केरळ, प. बंगाल आणि त्रिपुरामध्येही त्यांची कामगिरी खराब झाली आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या तीन निवडणुकांत माकप प्रमुख विरोधी पक्ष होता. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये कधी हा पक्ष देशात तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर होता. ही परिस्थिती सन २००४पर्यंत कायम होती. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये या पक्षाची दाणादाण उडाली आणि संसदेतही त्यांचे प्रतिनिधीत्व कमी होत गेले.
केरळमध्ये मोठा धक्का
केरळमध्ये सध्या माकपची सत्ता आहे. तरीही सत्ताधारी माकप येथे केवळ एक जागा जिंकू शकले आहे. त्यांनी गेल्या निवडणुकीतही केवळ एक जागा जिंकली होती. अर्थात माकपचा मतटक्का २५.८२ टक्के राहिला. तर, भाकपला ६.१४ टक्के मते मिळाली. एकूण ३२ टक्के मते मिळवूनही डावे पक्ष केवळ एकच जागा जिंकू शकले. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरात त्यांना एकही जागा मिळू शकली नाही. पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांना सहा तर, त्रिपुरामध्ये सुमारे १२ टक्के मते मिळाली.
तमिळनाडूमध्ये चार जागा
तमिळनाडूमध्ये माकप व भाकपने ‘इंडिया’ गटासोबत निवडणूक लढवली आणि दोन-दोन जागा जिंकल्या. राजस्थानमध्ये त्यांना एक जागा मिळाली. तर, बिहारमध्येही भाकपने दोन जागा जिंकल्या. अशा प्रकारे डाव्या पक्षांनी आठ जागा मिळवल्या. ही संख्या गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा दोनने अधिक आहे.
हे ही वाचा:
बायडेन-सुनक आणि पुतिन यांनी केले मोदी यांचे अभिनंदन
आज शिवाजी राजा झाला…! रायगड ऐतिहासिक सोहळ्यासाठी सुसज्ज
मुस्लिम महिलांनी मतं तर दिली, आता ‘गॅरंटी कार्ड’ घेण्यासाठी काँग्रेस कार्यालयाबाहेर रांगा
‘जिंकलो आम्ही अन उड्या मारत आहेत दुसरे’
डाव्या पक्षांचा मतटक्का
- २००४ ७.८५
- २००९ ७.४६
- २०१४ ४.५५
- २०१९ २.४६
- २०२४ २.५४