दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) हे काम असून राष्ट्रीय स्मारकाच्या कामाच्या पहिल्या टप्प्यात तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत आहे. पहिल्या टप्प्यातील जेमतेम दहा टक्के काम पूर्ण झाले असून येत्या एप्रिलपर्यंत उर्वरित काम पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे.
हे ही वाचा:
१२ नोव्हेंबरला उलगडणार हिम्मत सिंगची कथा
जयंत पाटलांच्या शिक्षण संस्थेने सरकारचीच जमीन सरकारला देऊन तीसपट मोबदला मिळवला!
ट्विटरचा हिंदू विरोधी चेहरा पुन्हा उघड
‘कॅप्टन’ काढणार स्वतःचा नवा ‘संघ’
स्मारकाच्या कामासाठी होणाऱ्या विलंबासंबंधीचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले आहे त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘मुंबईच्या महापौरांचा बंगला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी हडप केल्यावर तरी स्मारकाचे बांधकाम जलद गतीने होईल, अशी आशा होती. परंतु तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून अजूनही जेमतेम १० टक्केही काम झालेले नाही. टक्केवारी मुळे काम अडले नसावे, अशी आशा आहे.’ असा टोला भातखळकरांनी लगावला आहे.
मार्चमध्ये स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले असून यासाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. स्मारकाचे काम हे दोन टप्प्यात केले जाणार आहे. काही अडचणींमुळे पहिल्या टप्प्यातील कामे दोन महिने विलंबाने सुरू झाली.
मुंबईच्या महापौरांचा बंगला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी हडप केल्यावर तरी स्मारकाचे बांधकाम जलद गतीने होईल अशी आशा होती. परंतु तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून अजूनही जेमतेम १० टक्केही काम झालेले नाही.
टक्केवारी मुळे काम अडले नसावे अशी आशा आहे. pic.twitter.com/s2IRcz8ECb— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 20, 2021
स्मारकाच्या बांधकामासाठी महापौर बंगल्यातील ३० ते ४० झाडे कापावी लागणार होती. पण आता झाडे न कापता काम केले जात आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या आराखड्यात अनेक बदल करावे लागले आणि कामाला थोडा विलंब झाल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर श्रीनिवास यांनी सांगितले.