पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भोपाळ येथे समान नागरी कायद्याची पाठराखण केली. देशात दोन कायदे कसे चालतील?, असा प्रश्न उपस्थित करून या संवेदनशील मुद्द्यावर मुसलमानांना चिथावणी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एका कुटुंबात एकासाठी एक आणि दुसऱ्यासाठी दुसरा कायदा असेल, तर घर कसे चालेल?, अशी विचारणा करून भारतीय राज्यघटनेतही समान अधिकाराचा मुद्दा मांडण्यात आला आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. त्यावरून मुस्लिम नेत्यांमध्ये खळबळ माजली असून त्यांनी पुढील रणनिती ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.
मोदी यांच्या या वक्तव्यानंतर ऑल इंडिया मुस्लिम बोर्डाने ऑनलाइन बैठक बोलावली आहे. विधी आयोगासमोर मुस्लिमांचे विचार ठोसपणे मांडण्यासाठी या बैठकीत रणनिती आखली जाणार आहे. या ऑनलाइन बैठकीत देशभरातील सर्व मुस्लिम नेते सहभागी होणार आहेत.
विरोधी पक्षांची टीका
समान नागरी कायद्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. काँग्रेसने मंगळवारी या मुद्द्यावरून मोदी यांना लक्ष्य केले. केंद्र सरकारने आधी देशातील गरिबी, महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यावर लक्ष दिले पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे. ‘पंतप्रधान काहीपण बोलू शकतात. परंतु त्यांनी बेरोजगारी, महागाई आणि मणिपूरसारख्या समस्यांवर बोलले पाहिजे,’ अशी अपेक्षा काँग्रेसचे महासचिव सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केली. तर, राष्ट्रीय जनता दलानेही अशा मुद्द्यांना राजकीय हत्यार बनवता कामा नये, असे मत व्यक्त केले.
हे ही वाचा:
मुंबई महापालिका कोविड घोटाळा: लाईफलाईन कंपनीच्या कागदांवरील डॉक्टर्स अस्तित्वातचं नाहीत!
…आणि जवळगेने विकृत तरुणाकडून कोयता खेचला, त्यामुळे तरुणी बचावली!
हिंदू सहिष्णू आहेत म्हणून त्यांची परीक्षा पाहायची का? ‘आदिपुरुष’वरून न्यायालयाने झापले
‘आम्ही सलमान खानला ठार मारूच’ गँगस्टर गोल्डी ब्रार याची दर्पोक्ती
ओवैसींचीही नाराजी
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिमांना लक्ष्य करण्यासह हिंदू नागरिक कायदा आणू पाहात आहेत,’ असा आरोप एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.