सतत संगणकासमोर बसून शिक्षण घेण्यात येत असल्यामुळे आता बालकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. कोरोनामुळे शिक्षणाची पद्धती बदलली असून, या बदललेल्या पद्धतीमुळे आता विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. कोरोनामुळे शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल झाले.
शासनाकडून गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग अवलंबिण्यात आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि इतर गोष्टींवर परीणाम झालेला दिसून येत आहे. आता दुसरे वर्षही ऑनलाइनच्या माध्यमातून शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळेच मुलांमधील शारीरीक हालचाली आता कमी झालेल्या आहेत. कोरोनामुळे घराबाहेर जाणयास मज्जाव असल्यामुळे, तसेच सतत संगणकासमोर बसून डोळ्यांनाही त्रास बळावतो आहे. डोळ्यांचे आजारपण अनेक मुलांमध्ये आता दिसून आलेले आहे. म्हणूनच आता मुलांचे शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य जपणे महत्त्वाचे झाले आहे.
आहारतज्ज्ञांच्या मते केवळ घराच असल्यामुळे मुलांना भूक लागत नाही. मग प्रसंगी वेळ मारून नेण्यासाठी मैदा, वेफर्स असे वरचे पदार्थ मुले खातात. त्यामुळेच हे पदार्थ वरचेवर खाणे हे आरोग्यास हितावह नाही, असे मत आहारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. योग्य आहार आणि व्यायाम मुलांसाठी या काळामध्ये गरजेचा आहे.
हे ही वाचा:
शरद पवार-प्रशांत किशोर पुन्हा झाली भेट
सातवा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
ओबीसी आरक्षणासाठी २६ जूनला भाजपतर्फे चक्का जाम
योग दिनानिमित्त एम. योगा अॅपची भारतीयांना भेट
पालकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन मुलांमध्ये व्यायामाचे महत्त्व जागृत करायला हवे. तसेच जंक फूड खाण्याचे प्रमाण हे कमीच करायला हवे. जंक फूडपेक्षा मुलांना फळे, कोकम सरबत हे असे प्रकार द्यावेत. मुख्य म्हणजे आहारामध्ये तेलकट, तूपकट तसेच मैद्याच्या पदार्थांचा समावेश अजिबात करू नये असा वैद्यकिय सल्लाही देण्यात आलेला आहे.
संगणकावर शिकत असताना सतत कानाला एअरफोन लावल्यामुळे कानाच्या समस्या या भविष्यात फार मोठ्या प्रमाणात उद्भवणार आहेत. त्यामुळे स्पिकरचा आवाज कमी करूनच शिक्षण घ्यायला हवे. सरकारने घरबसल्या शिक्षणाचा पर्याय खुला करून दिला. परंतु एकूणच या पर्यायाचे दुष्परीणाम खूपच आहेत. एकूणच हे चित्र पाहता, आता पालकांनाच डोळ्यात तेल घालून मुलांकडे लक्ष द्यावे लागणार आहे.