निवडणूक प्रक्रिया पारदर्शक बनवण्याच्या हेतूने निवडणूक आयोगाने सोमवार, ३ जुलै रोजी ऑनलाईन पोर्टल सुरू केले. या पोर्टलवर सर्व राजकीय पक्षांना त्यांचा आर्थिक तपशील, निवडणूक खर्च आणि पक्षाला मिळालेल्या निधीची माहिती द्यावी लागणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार गेल्या एक वर्षापासून या पोर्टलच्या कल्पनेवर काम करत होते. हे पोर्टल निवडणूक आयोगाच्या ३- सी धोरणाचा भाग आहे. या अंतर्गत स्वच्छता, बेकायदेशीर निधीवर कारवाई आणि राजकीय निधी आणि खर्चामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी नियमांचे पालन करणे समाविष्ट आहे. या अंतर्गत स्वच्छता, बेकायदेशीर निधीवर कारवाई आणि राजकीय निधी आणि खर्चामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी नियमांचे पालन करणे समाविष्ट आहे.
हे ही वाचा:
बेन स्टोक्सवर कोहली, स्मिथची स्तुतीसुमने
राष्ट्रवादीच सरकारमध्ये सामील झाल्याने ‘मविआ’ नामशेष!
‘ते’ ९ आमदार वगळता बाकीच्यांना पक्षाची दारे खुली
शपथविधीला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे सर्व नेते बडतर्फ
लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ अंतर्गत, निवडणूक आयोगाला सर्व राजकीय पक्षांनी नियतकालिक आर्थिक विवरणे सादर करणे आवश्यक आहे. जे राजकीय पक्ष या पोर्टलवर त्यांच्या आर्थिक विवरणपत्रांची माहिती देत नाहीत, त्यांना लेखी कारणे द्यावी लागतील. यासोबतच सीडी आणि पेन- ड्राइव्हसह विहित नमुन्यात अहवाल भरावा लागणार आहे. निवडणूक आयोग सर्व पक्षांचे अहवाल ऑनलाइन प्रसिद्ध करेल. याबाबत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहिले आहे.