मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला होता, त्यानंतर आता एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

या व्यक्तीने मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीमुळे पोलिसांनी धावपळ करत त्याला रोखले.

मंत्रालयाच्या गार्डन गेटला सदर घटना घडली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदार संघातील ही व्यक्ती असून स्थानिक पोलिसांच्या संदर्भात मंत्रालायत ते तक्रार घेऊन आले होते. सदर व्यक्तीला पोलीस सेंट जॉर्ज हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली असल्याची माहिती आहे. या व्यक्तीचे नाव सुभाष सोपान जाधव (५४) असून ही व्यक्ती राजणे, आंबेगाव पुणे येथे राहणारी आहे. गावच्या जमिन व घर बळगावल्याच्या व मारहाण केल्याच्या वादातून मंत्रालयात समोर आत्महतयेचा प्रयत्न आता त्याला उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:

मोदी सरकारची विद्युत वाहनांच्या दिशेने वेगाने वाटचाल

अमेरिकेच्या माघारीबद्दल त्या शहीद सैनिकाच्या वडिलांना दुःख

तालिबानकडे अमेरिकन शस्त्रास्त्र

चिमुकल्या वरदचा खून की नरबळी?

पोलिसांच्या जाचाला कंटाळून पुण्यातही या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आता त्याने शुक्रवारी मंत्रालायत पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीने सांगितले की, मी अनेकदा मंत्रालायत येऊन न्याय मागितला पण मला न्याय मिळाला नाही. काही वर्षांपूर्वी धर्मा पाटील या शेतकऱ्याने अशाच प्रकारे मंत्रालयात विष घेऊन आपलं जीवन संपवलं होते.

Exit mobile version