…आता हा नेता काँग्रेस सोडण्याच्या तयारीत!

…आता हा नेता काँग्रेस सोडण्याच्या तयारीत!

काँग्रेसची गेल्या काही वर्षात वाईट ते अतिवाईट अशी अवस्था होऊ लागली आहे. काँग्रेसचे एकेकाळचे खंदे समर्थक या पक्षातून बाहेर पडून आपला स्वतंत्र मार्ग चोखाळू लागले आहेत. आणखी एक नेता आता काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहे.

पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चांगलाच भडकण्याची शक्यता आहे. ‘आतापर्यंत झाला तो अपमान पुरे झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही’ असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना दिला आहे. आज होणाऱ्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची खदखद बाहेर पडली असून त्यांनी आता ‘आर या पार’ अशी भूमिका घेतली आहे.

पंजाबमधील ४० सिद्धू समर्थक मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री तृप्त राजेंद्र सिंग बाजवा यांच्या नेतृत्वात हायकमांडला चिठ्ठी लिहिली होती. त्यात लवकरात लवकर आमदारांची बैठक बोलावण्याची मागणी करण्यात आली होती. नवज्योतसिंग सिद्धू यांना साथ दिल्याने या आमदारांच्या मतदारसंघातील अधिकारी बदलण्यात आले. या मतदारसंघात नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून हे अधिकार या आमदारांचं ऐकत नाहीत. त्यामुळे हे आमदार नाराज आहेत. आमदारांनी या सर्व गोष्टी चिठ्ठीत लिहिल्या आहेत. तसेच केंद्रीय पर्यवेक्षकाच्या उपस्थित लवकरात लवकर आमदारांची बैठक बोलावण्याची मागणी त्यांनी सोनिया गांधींकडे केली आहे.

पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांच्यातील आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग्रेस हायकमांडला होती. पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला. पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद आता भडकण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

इस्लामिक स्टेट सोशल मीडियावरून प्रसार करण्याच्या प्रयत्नात

टी २० वर्ल्डकपनंतर कुंबळे प्रशिक्षकपद स्वीकारणार?

हे हल्ले दहशतवाद्यांची निराशा दर्शवतात

न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडकडचाही पाकिस्तान दौरा रद्द?

२०२२ मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे पंजाबात राजकीय वातावरण गरम आहे. त्यात पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी माजल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग विरूद्ध नवज्योतसिंग सिद्धू असे थेट दोन गट पडले आहेत. सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पक्षातच आव्हान दिलं आहे. त्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून सिद्धू यांची वर्णी लावून काँग्रेस हायकमांडनेही सिद्धूच्या पारड्यात वजन टाकलं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत नवज्योत सिद्धू हे काँग्रेसचा चेहरा असतील असं बोललं जात आहे.

Exit mobile version