राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, यावेळी राष्ट्रीय एकता दिन एक अद्भुत योगायोग घेऊन आला आहे. एकीकडे आपण एकात्मतेचा सण साजरा करत आहोत, तर दुसरीकडे दिवाळीचा पवित्र सण आहे. आता दिवाळीचा सण भारताला जगाशी जोडत आहे. अनेक देशांमध्ये हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पहार अर्पण केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जगात असे काही लोक होते जे भारताच्या विघटनाचा विचार करत होते. शेकडो संस्थान एकत्र करून एक भारत निर्माण होईल, अशी आशा त्यांना नव्हती. पण, सरदार वल्लभभाई पटेल यांनी ते करून दाखवले. हे शक्य झाले कारण सरदार साहेब वागण्यात वास्तववादी, संकल्पात सत्यवादी, कृतीत मानवतावादी आणि ध्येयाने राष्ट्रवादी होते. पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, आम्ही वन नेशन, वन टॅक्स सिस्टम जीएसटी बनवली; आता आम्ही वन नेशन, वन इलेक्शनवर काम करत आहोत.
आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला की केंद्राचा ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हा प्रस्ताव, ज्याचा उद्देश देशातील सर्व निवडणुका एकाच दिवशी किंवा विशिष्ट कालावधीत घेण्याचे उद्दिष्ट आहे ते लवकरच मंजूर केले जाईल आणि ते प्रत्यक्षातही येईल. या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती आणि या वर्षाच्या अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनासमोर मांडण्यात येईल. नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही आता ‘वन नेशन वन इलेक्शन’च्या दिशेने काम करत आहोत, ज्यामुळे भारताची लोकशाही बळकट होईल, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशाला नवी गती मिळेल.
आज संपूर्ण देश आनंदी आहे की, स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर एक देश आणि एक संविधानाचा संकल्प पूर्ण झाला आहे. ७० वर्षांपासून बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची अंमलबजावणी झाली नाही. कलम ३७० ला कायमचे काढून टाकण्यात आले आणि या विधानसभेच्या निवडणुकीत प्रथमच त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांनी भारतीय राज्यघटनेची शपथ घेतली असेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा :
बेरोजगार असलेल्या ५६ वर्षीय मुस्तफाने दिली होती सलमानला धमकी, केली अटक
दिवाळीनिमित्त पंतप्रधान मोदींनी निरोगी, आनंदी आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा
केंद्रीय खर्च निरीक्षक विजय बाबू वसंता यांच्यामार्फत मुंबई शहरातील स्टॅटिक सर्व्हेलन्स टीमचा आढावा!
५०० वर्षांनंतर साजरी होणार दिवाळी; २८ लाख दिव्यांच्या प्रकाशाने उजळली अयोध्यानगरी
राष्ट्रीय एकता दिवस परेडमध्ये नऊ राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश, चार केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, नॅशनल कॅडेट कॉर्म्स (NCC) आणि मार्निंग बँडच्या १६ मार्चिंग तुकड्यांचा समावेश होता. विशेष आकर्षणांमध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG) चे हेल मार्च तुकडी, BSF आणि CRPF बाईकर्सचा डेअरडेव्हिल शो, BSF द्वारे भारतीय मार्शल आर्ट्सचे प्रदर्शन, शाळकरी मुलांचा पाइप्ड बँड शो आणि ‘सूर्य किरण’ फ्लायपास्ट होते.