काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांचा पबमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची चांगलीच चर्चा रंगली होती. तर त्यानंतर आता राहुल गांधी यांचा आणखीन एक व्हिडिओ समोर आला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध भाजपा हा संघर्ष तापण्याची चिन्हे आहेत
काय आहे या व्हिडिओमध्ये?
राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ तेलंगणा राज्यातील आहे. शुक्रवार, ६ मे रोजी तेलंगणा हैदराबाद येथे राहुल गांधी यांची सभा पार पडली. या सभेच्या आधी राहुल गांधी यांनी तेलंगणा येथील स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधला. एका बंद दाराआड तेलंगणामधील काँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत हा संवाद सुरू होता तेव्हा राहुल गांधी यांनी चक्क त्यांना आजच्या सभेची थीम काय आहे? काय बोलायचे आहे? असे विचारले. ही संपूर्ण घटना व्हिडिओत कैद होत होती. हे लक्षात आल्यावर राहुल गांधी यांनी व्हिडिओ शूटिंग बंद करण्यास सांगितले.
हे ही वाचा:
ठाकरेंच्या आधी पवार पोहोचले अयोध्येला! राष्ट्रवादीलाही लागले हिंदुत्वाचे वेध?
‘ठाकरे सरकार राज ठाकरेंना घाबरले’
बीडच्या अविनाश साबळेने मोडला तीस वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम
टाटा स्टील प्लांटमध्ये मोठा स्फोट, तीन जखमी
हा व्हिडीओ अमित मालवीय यांनी ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांची तेलंगणा येथील सभा ही शेतकऱ्यांसाठी होणे अपेक्षित होते. पण त्याआधी हे विचारतात सभेची थीम काय? काय बोलायचे आहे? वैयक्तिक परदेश दौरे आणि नाईटक्लबींग यामध्ये कधीतरी राजकारण केल्यावर हे असे होते.
Yesterday, Rahul Gandhi before his rally in Telangana, supposedly in solidarity with farmers, asks what is the theme, क्या बोलना है! 🤦♂️
This is what happens when you do politics in between personal foreign trips and nightclubbing…
Such exaggerated sense of entitlement. pic.twitter.com/NdRBDlGNK3
— Amit Malviya (@amitmalviya) May 7, 2022