मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे सोबतच एका विधान परिषदेच्या आमदाराचेही नाव?

मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे सोबतच एका विधान परिषदेच्या आमदाराचेही नाव?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ‘आक्षेपार्ह’ ट्वीट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या समीत ठक्करने सचिन वाझे प्रकरणी खळबळजनक ट्वीट केले आहे. सध्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी एपीआय सचिन वाझे अडचणीत आले आहेत. अशातच या ट्वीटमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

एनआयएच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, एपीआय सचिन वाझे यांच्या सीडीआरवरून असे दिसून येते की ते मनसुख हिरेन यांच्यासमवेत महाराष्ट्रातील एका नेत्याशी सतत संपर्कात होते. वाझे आणि नेते यांच्यात टेलीग्राम वर चॅट झाला आहे. तो विद्यमान आमदार आहे, एवढेच मी सांगू शकतो. कारण, मला माझ्यावर आणखी एक गुन्हा नकोय. एनआयए चौकशी करीत आहेच, त्यांचं काम त्यांना करुद्या. मला मिळालेली माहिती मी शेअर केली आहे. असे ट्विट समीत ठक्करने केले आहे.

नागपूरचा रहिवासी समित ठक्कर याने ठाकरे पितापुत्रांच्याविरोधात ट्विटर वर दोन ‘आक्षेपार्ह’ पोस्ट केले होते. याप्रकरणी नागपूर तसेच मुंबईच्या व्ही.पी. मार्ग पोलीस ठाण्यात ठक्कर विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. हा एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी ठक्करने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. नागपूर खंडपीठाने त्याला तिथल्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. मात्र, मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी आरोपी असल्यानं तो पळून जाऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मुंबईच्या गिरगाव येथील दंडाधिकारी न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. कोर्टाने आरोपीला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

हे ही वाचा:

एपीआय वाझेंना तात्काळ निलंबित करा – आमदार अतुल भातखळकर

सचिन वाझे यांची एनआयए कडून चौकशी

सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?

समीत ठक्करच्या या ट्वीटमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. हा विधानपरिषदेचा आमदार कोण? याचा मनसुख हिरेन प्रकरणात नक्की काय हात आहे? या आमदाराचे नाव नक्की कधी उघड होईल या सर्व प्रश्नांची उत्तरे एनआयएच्या तपासातून बाहेर येतील अशी आशा आहे.

Exit mobile version