एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे देश सोडून जातील

शिवसेना नेते रामदास कदम यांचा निशाणा

एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे देश सोडून जातील

शिवसेना नेते रामदास कदम हे सहकुटुंब साईदरबारी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. रामदास कदम म्हणाले की, “साईबाबांनी महायुतीला मोठा कौल दिला आहे. दोन दिवसांत महायुतीचे सरकार बनेल. महाराष्ट्रातील जनतेने १८ ते २० तास महाराष्ट्रात काम करणारा मुख्यमंत्री पाहिला आणि व्यक्तीमत्व म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत.”

पुढे रामदास कदम म्हणाले की, “मागच्या वेळी आमचा आकडा कमी असतानाही भाजपच्या वरिष्ठांनी संधी दिली. आता भाजपाचे १३३ हून अधिक आमदार आहेत. त्यामुळे आम्ही किती मागावे? काय मागावे? याचे भान ठेवलं पाहिजे. आम्हा सर्वांचीच इच्छा आहे की, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं. परंतु, भाजपला देखील त्यांचा पक्ष चालवायचा आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,” असं रामदास कदम म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले की, “एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या कुटुंबाला घेऊन देश सोडून जातील. माझे हे शब्द असून तुमच्याकडे लिहून ठेवा. बाळासाहेब यांच्याशी त्यांनी जी बेईमानी केली. शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी जे पाप केले. त्या पापाचे प्रायश्चित्त उद्धव ठाकरेंना भोगावच लागेल,” असं म्हणत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

हे ही वाचा..

संभलमध्ये हिंसाचारादरम्यान अचानक मोठ्या संख्येने लोक शस्त्रे घेऊन कसे पोहचले?

घाटकोपरमध्ये लव्ह जिहाद प्रकरण, आरोपी नौशादवर गुन्हा दाखल!

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी!

मणिपूरमधील संवेदनशील भागात व्यापक शोध मोहीम; ९४ चौक्या स्थापन

महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर भाष्य केले जात आहे यावर बोलताना रामदास कदम म्हणाले की, लोकसभेत त्यांना जास्त जागा मिळाल्या आणि त्यांचे खासदार निवडून आले. तेव्हा त्यांनी ईव्हीएम मशिनवर खापर फोडले का? नाही ना. मग आता विधानसभेत महायुतीच्या बाजूने निकाल लागला आहे. त्यामुळे त्यांना कारण हवे आहे. बाजूने निकाल लागला की मशीन चांगले आणि विरोधात निकाल लागला की मशीन वाईट, असा कसा निकष आहे,” असं म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.

रोहित पवार आता रडगाणे बंद करा! | Mahesh Vichare | Rohit Pawar | Mahavikas Aghadi | Mahayuti Sarkar

Exit mobile version