रविवारी उत्तराखंडची एक दिवसाची मुख्यमंत्री म्हणून हरिद्वार जिल्ह्याची रहिवासी असणाऱ्या स्रिष्टी गोस्वामी हिने कारभार सांभाळला. १९ वर्षीय स्रिष्टीने या वेळेला राज्याच्या पोलिस महाअधिक्षकांना स्त्रियांच्या सुरक्षेची अधिकाधीक काळजी घेण्याची सुचना केली.
रविवारी संध्याकाळी देहराडून मधील सर्व कार्यालये बंद झाल्यानंतरही उत्तराखंड विधानसभा भवनाच्या खोली क्र. १०२ मध्ये १९ वर्षीय मुख्यमंत्री स्रिष्टी विविध विभागांच्या प्रगतीचा अहवाल पाहात होती. राज्याच्या पोलिस महाअधिक्षक निलेश आनंद भारणे यांनी गुन्ह्यांचा अहवाल सादर केल्या नंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सार्वजनिक वाहनांतील स्त्रियांच्या सुरक्षेची आणि शाळेपासूनच्या ५००मी. च्या परिसरात कोणत्याही तऱ्हेच्या मादक उत्पादनांच्या विक्रीस बंदी घालण्यास सांगितले.
ऍग्रिकल्चरल सायन्सची (कृषी विज्ञान) विद्यार्थी असणाऱ्या स्रिष्टीची उत्तराखंड राज्याची प्रातिनिधीक मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागली. राज्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगाने नायक या सिनेमाच्या कल्पनेवर आधारित ही संकल्पना राबवली होती.
तो तर सिनेमा होता, हे वास्तव आहे. तुम्ही माझ्या उत्साहाचा विचार करू शकता. मी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांची मला ही सुवर्णसंधी दिल्याबद्दल आभारी आहे. या शब्दात गोस्वामी हिने तीच्या चार तासांच्या कार्यकाळाच्या अंती आपल्या भावना व्यक्त केल्या. याबरोबच जर तिला खरोखरच मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर बालकांशी निगडीत प्रश्न सोडवायला प्राधान्य देऊ असंही तीने सांगितलं.
हरिद्वार जिल्ह्यातील दौलतपूर गावाची रहिवासी असणाऱ्या गोस्वामीचे वडील किराणा मालाचे दुकान चालवतात, तर आई अंगणवाडी सेविका आहे. स्रिष्टी तीन वेळेला २०१८ पासून बाल विधानसभेवर मुख्यमंत्री म्हणून निवडून गेली आहे. त्यामुळेच तिला एक दिवसासाठी मुख्यमंत्री पद देण्यात आले.
यावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी या नात्याने राज्याचे उच्च शिक्षण मंत्री धन सिंग रावत हे उपस्थित होते. मुख्यमंत्री हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीची तपासणी करण्यात गुंतले असल्याने ते येऊ शकले नाहीत.