राजस्थानमधील उदयपूरमध्ये टेलर कन्हैया लाल यांची दोन मुस्लिम कट्टरपंथीयांनी हत्या केली होती. या घटनेनंतर देशभरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते कपिल मिश्रा यांनी हा बहुसंख्य समाजावरील हल्ला असल्याचे म्हटले आहे.
कपिल मिश्रा यांनी ट्विट केले आहे की, “उदयपूरमध्ये कन्हैया लालजी यांचीहत्या म्हणजे देशातील बहुसंख्य समाजाला घाबरवण्याचा प्रयत्न असून त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. यासोबतच पीडितेच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी एक कोटी रुपये जमा करण्याचे त्यांनी आवाहन केले होते.”
Jai Shri Ram
Thank you all 🙏
₹ One Crore collected
in less than 24 hoursMy tears can't stop
Hindus stand together with family of Kanhaiya Ji #HinduEcosystem
We will also give ₹ 25 Lakh to Ishwar Singh ji who is in hospital
Click Now: https://t.co/a4dYzT0nH3
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) June 29, 2022
त्यानंतर २४ तासात एक करोड रुपये जमल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले आहे. सर्व हिंदू कन्हैया लाल यांच्या कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. जमवलेले हे पैसे कपिल मिश्रा स्वतः उदयपूरला जाऊन कन्हैया लालच्या कुटुंबीयांना सुपूर्द करणार आहेत.
हे ही वाचा:
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसळकर
कुलगाममध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द; बहुमत चाचणीची आता गरज नाही
‘उद्यापासून मी शिवसेना भवनात बसणार’
कपिल मिश्रा यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे जंतर मंतरवर कँडल मार्च काढण्याची परवानगी मागितली होती, मात्र, दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यानंतर त्यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारचे धरणे-प्रदर्शन करून जातीय सलोखा बिघडवण्याचा त्यांचा हेतू नसून त्यांना फक्त दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. त्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करायची आहे.