सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी एकाला अटक

सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी एकाला अटक

गायक सिद्धू मूसेवाला याची रविवार, २८ मे रोजी पंजाबमध्ये हत्या करण्यात आली. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी एकाला अटक केली आहे. उत्तराखंडमधून मनप्रीत सिंह नावाच्या व्यक्तीला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर मनप्रीत याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी सोमवारी डेहराडूनमधून पाच संशयितांना ताब्यात घेतलं होतं.

अटक करण्यात आलेल्या मनप्रीत याने सिद्धू याच्या मारेकऱ्यांना गाडी पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. त्यानंतर न्यायालयाने मनप्रीत याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनवली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले पाच जण हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील हेमकुंड साहिब गुरुद्वाराकडे जात होते. या पाच जणांना शिमला बायपास रोडवरून ताब्यात घेऊन चौकशीसाठी पंजाबला आणण्यात आले आहे. पंजाब पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटवर फिरोजपूर तुरुंगातून दोघांना ताब्यात घेतलं आहे. या हत्या प्रकरणातील पुढील चौकशी सुरू आहे.

हे ही वाचा:

कॉन्सर्टमध्ये गात असतानाच गायक के के यांचे निधन

पीएफआयने केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान

तंबाखूमुळे प्रतिवर्षी १० लाख मृत्यू

कॅनडामध्ये पिस्तूल व्यापार मर्यादित करण्यासाठी नवीन विधेयक

पंजाबमधील आप सरकारनं ४२४ जणांची सुरक्षा काढली आणि दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

Exit mobile version