सागरिका घोष पूर्वी म्हणाल्या होत्या, ‘मी कधीही राज्यसभेचे तिकीट स्वीकारणार नाही, लिहून देते’

तृणमूल काँग्रेसने राज्यसभेसाठी नामांकित केलेल्या सागरिका घोष यांचे जुने ट्वीट वादात

सागरिका घोष पूर्वी म्हणाल्या होत्या, ‘मी कधीही राज्यसभेचे तिकीट स्वीकारणार नाही, लिहून देते’

रविवारी तृणमूल काँग्रेसने पत्रकार सागरिका घोष यांचे नाव आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी जाहीर केले आहे. या दरम्यान त्यांचे जुने ट्वीट व्हायरल झाले आहे. ‘पत्रकारांनी राज्यसभेचे तिकीट स्वीकारू नये. मी कधीही कोणत्याही राजकीय पक्षाकडून राज्यसभेचे तिकीट घेणार नाही, हे मी तुम्हाला लिहून देऊ शकते आणि तुम्ही हे ट्वीट राखून ठेवू शकता,’ असे ट्वीट तेव्हा केले होते. त्यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावरून टीका होत आहे.

सागरिका घोष यांनी तेव्हा टीका करताना पत्रकारांनी राजकारणापासून दूर राहावे आणि कोणत्याही राजकीय पक्षाशी एकनिष्ठ असू नये, असे मत व्यक्त केले होते. भारतीय समाज बळकट होण्यासाठी, पुरोगामी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि न्यायासाठी काम करण्याकरिता हे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले होते.

 

तेव्हा त्यांनी राज्यसभा तिकीट किंवा सरकारकडून नियुक्ती मिळण्यापेक्षा पत्रकार म्हणून राहणे अधिक उत्तेजित करणे असल्याचे म्हटले होते. मात्र आता त्यांना तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेचे तिकीट मिळाल्याने सोशल मीडियावर नेटिझन्सनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. गेल्या काही वर्षांत घोष यांनी तृणमूल काँग्रेसच्या विचारांना पत्रकारितेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले होते. १२ वर्षांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी घोष घेत असलेल्या मुलाखतीतून काढता पाय घेतला होता.

हे ही वाचा:

अल जझीराचा पत्रकार मोहम्मद वाशाह निघाला हमासचा कमांडर  

आगे आगे देखो होता है क्या !

भारतातील उद्योग संघटना एक राष्ट्र, एक निवडणुकीच्या पाठीशी

“पंतप्रधान मोदींनी केलेल्या वैयक्तिक हस्तक्षेपामुळे आम्ही मायदेशात परतू शकलो”

राजदीप सरदेसाई यांच्यावरही टीका

नेटिझन्सनी सागरिका घोष यांचे पती राजदीप सरदेसाई यांच्यावरही टीका केली आहे. राजदीप यांनीही पत्रकारांनी राज्यसभेचे तिकीट अथवा सरकारचे कोणतेही पद स्वीकारू नये, असे मत व्यक्त केले होते. सन २०१८मध्ये लिहिलेल्या ‘द जर्नलिस्ट ऍज नेता’ या ब्लॉगमध्ये त्यांनी पत्रकारांनी राज्यसभेचे किंवा राजकीय पक्षाचे तिकीट स्वीकारावे का? असा प्रश्न विचारून यावर टीका केली होती. तसेच, आपण स्वतः एका प्रादेशिक पक्षाने दिलेला राज्यसभेचा प्रस्ताव धुडकावल्याचे म्हटले होते. तसेच, ज्या पत्रकारांना राजकारणात प्रवेश करायचा आहे, त्यांनी प्रथम पत्रकारिता सोडावी, असे आवाहनही केले होते. त्यावरून नेटिझन्स राजदीप यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत.

Exit mobile version