पुन्हा एकदा संकट काळात संघाची मदत

पुन्हा एकदा संकट काळात संघाची मदत

संपूर्ण देशात कोरोनाचा कहर चालू असताना पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मदतीला धावला आहे. संघाने यापूर्वीच्या लाटेत देखील लोकांची मदत केली होती. दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरात आपल्या संघ स्वयंसेवकांच्या मदत देण्यासाठी त्यांचे मोबाईल नंबर प्रसिद्ध केले आहेत.

दुसऱ्या लाटेत लोकांना मदत करण्यासाठी म्हणून प्रांतवार एकेका संघ स्वयंसेवकाची नेमणुक करण्यात आली आहे. त्या स्वयंसेवकाचा मोबाईल नंबर देखील देण्यात आला आहे. या स्वयंसेवकांकडे मदत मागितली जाऊ शकते.

हे ही वाचा:

कुडमुड्या गोखले गँगचा गलका

साकेत गोखले यांच्याविरोधात तक्रार दाखल

दिल्लीत लॉकडाउनआधी तळीरामांची गर्दी

ट्वीटरवर गाजला ‘अरेस्ट साकेत गोखले’ ट्रेंड

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव आणि आंध्र प्रदेशचे सह प्रभारी सुनिल देवधर यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे,

आरएसएसला रेडी फॉर सेल्फलेस सर्विस या नावाने देखील ओळखले जाते. ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची देशव्यापी यादी आणि कोविड-१९ हेल्पलाईन नंबर आहेत जास्तीत जास्त लोकांना ही माहिती लवकरता लवकर पोहोचवा.

यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या जनकल्याण समिती आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यानंतर आता, या यादीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण समाजासाठी सदैव कटीबद्ध असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दाखवून दिले आहे.

Exit mobile version