जागतिक रेडिओ दिन; रेडिओ हे लोकांना जोडणारे उत्तम माध्यम

जागतिक रेडिओ दिन; रेडिओ हे लोकांना जोडणारे उत्तम माध्यम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा

दरवर्षी १३ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक रेडिओ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ऑल इंडिया रेडिओशी संबंधित सर्व कर्मचारी आणि श्रोत्यांना जागतिक रेडिओ दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

१३ फेब्रुवारी रोजी ट्विटच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी म्हणाले, “सर्व रेडिओ श्रोत्यांना आणि त्यांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेने हे उत्कृष्ट माध्यम समृद्ध करणाऱ्यांना जागतिक रेडिओ दिनाच्या शुभेच्छा. घरी असो, प्रवासात असो आणि अन्यथा, रेडिओ लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहतो. लोकांना जोडण्यासाठी हे एक उत्तम माध्यम आहे.”

ते पुढे म्हणाले, “मन की बात मुळे, मी वेळोवेळी पाहतो की सकारात्मकता शेअर करण्यासाठी तसेच इतरांच्या जीवनात गुंतलेल्या लोकांना ओळखण्यासाठी रेडिओ हे एक उत्तम माध्यम आहे. मध्ये गुणात्मक बदल घडवून आणण्यात रेडिओ आघाडीवर आहे. या कार्यक्रमात ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचेही मी आभार मानू इच्छितो.

हे ही वाचा:

एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा

धक्कादायक! चंद्रभागेचे पाणी आरोग्यासाठी हानिकारक

तुम्ही पाटील आहात, जोशीबुवांचे काम करू नका!

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची नौदलाच्या साह्याने भर समुद्रात थरारक कारवाई

जाणून घेऊया रेडिओचा इतिहास

आजही रेडिओ हे माहिती पसरविण्याचे सर्वात शक्तिशाली माध्यम म्हणून याकडे पाहिले जाते. १३ फेब्रुवारी १९४५ रोजी संयुक्त राष्ट्र रेडिओचे पहिल्यांदा प्रसारण झाले. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जागतिक रेडिओ दिन म्हणून साजरा केला जातो. ‘ऑल इंडिया रेडिओ’ला ‘आकाशवाणी’ हे नाव म्हैसूरच्या एम. व्ही. गोपालस्वामी यांनी दिले. भारतात रेडिओची सुरुवात १९२३ साली रेडिओ क्लब इथे झाली.१९३६ साली त्याला ‘ऑल इंडिया रेडिओ’ हे नाव मिळाले. ऑल इंडिया रेडिओ हे जगातील सर्वात मोठे रेडिओ नेटवर्क आहे. आकाशवाणीच्या अनेक भाषांमध्ये अनेक सेवा आहेत. प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, लखनौ आणि तिरूचिरापल्ली या ठिकाणी आकाशवाणीची प्रमुख केंद्र आहेत.

Exit mobile version