मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेतले, जरांगेंचे उपोषण मागे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर उपोषण मागे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेतले, जरांगेंचे उपोषण मागे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. गेले १७ दिवस जरांगे पाटलांची समजूत काढण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू होते. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार, १४ सप्टेंबर रोजी जरांगे पाटलांच्या भेटीला जालना येथे पोहचले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर आणि त्यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर १७ व्या दिवशी अखेर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले आहे.

मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळांचे सरबत पिऊन जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी आले त्यानंतर त्यांनी जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पुढे मुख्य विषयाला हात घालत त्यांच्याशी चर्चा केली. अखेर जरांगे पाटलांनी त्यांचे उपोषण मागे घेतले.

मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आपले आमरण उपोषण देखील मागे घेणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. मात्र, मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले आणि त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यंमत्री यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी देखील आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे.

हे ही वाचा:

केरळमध्ये ‘निपाह’चा पाचवा रुग्ण; मिनी लॉकडाऊन लागू

बिहारमधील ‘वैशाली’ लोकशाही उत्सवात प्रियदर्शी दत्तांच्या पुस्तकाचे प्रकाशन

उद्धव ठाकरे यांच्या लंडनमधील प्रॉपर्टीवर शिक्कामोर्तब

वनडे वर्ल्डकपमधील न्यूझीलंड संघातील खेळाडूंच्या नातेवाईकांची अनोखी जाहिरात

अंतरवाली सराटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, मंत्री संदिपान भुंबरे, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदी नेते उपस्थित होते.

Exit mobile version