तिकीट कापल्यावर भाजपाचे बिधुरी म्हणाले, ‘पाहुण्यां’चा आदर केला पाहिजे!

रमेश बिधुरींच्या जागी रामवीर बिधुरी यांना भाजपकडून संधी

तिकीट कापल्यावर भाजपाचे बिधुरी म्हणाले, ‘पाहुण्यां’चा आदर केला पाहिजे!

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने काल १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.यामध्ये अनेक विद्यमान खासदारांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.दिल्लीत मनोज तिवारी यांना वगळून चार जागांवर नवीन उमेदवार उभे करण्यात आले आहेत.यामध्ये दक्षिण दिल्लीतील रमेश बिधुरी यांच्या नावाचा समावेश आहे. रमेश बिधुरी यांच्या जागी बदरपूरचे चार वेळा आमदार राहिलेले आणि विधानसभेत केजरीवाल यांच्याविरोधात तोफ डागणारे रामवीर बिधुरी यांना भाजप पक्षाकडून संधी देण्यात आली आहे.

रमेश बिधुरी वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांच्या नावाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.तिकीट रद्द झाल्याची व्यथा आता त्यांच्या वक्तव्यातून दिसून येत आहे.आज तकच्या बातमीनुसार, लोकसभेच्या निवडणुकीत रमेश बिधुरी यांचा पत्ता कट झाल्यानंतर ते म्हणाले की, भाजप हा मोठा पक्ष आहे, कुटुंबाचा पक्ष नाही.

हे ही वाचा:

भारतीय नौदलाचा खलाशी बेपत्ता, शोध मोहीम सुरु!

दिल्लीतील बदरपूरमध्ये कारचे नियंत्रण सुटून ट्रकला धडक, तीन जणांचा मृत्यू!

तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवतो म्हणणारा अटकेत

टेक कंपन्यांना ‘एआय’ प्रोडक्ट लाँच करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी

आम्ही विचारांसाठी लढणारे कार्यकर्ते आहोत.पक्षामध्ये जेव्हाही बाहेरून लोक येतात, तेव्हा त्यांचा तसा आदर केला जातो, जसाकी आपल्या घरी कोणी बाहेर पाहुणा आला की, त्यांच्या झोपण्यासाठी आपण नवीन बेडशीट अंथरतो आणि आपण जुन्या बेडशीटवर तसेच झोपतो. पाहुण्यांचा आदर केला पाहिजे, त्यासाठी कुटुंबाचे हृदय ठेवावे लागते, असे रमेश बिधुरी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ते पाहुणे आहेत आणि आम्ही कुटुंबातील सदस्य आहोत.कधी-कधी अतिथींसाठी नवीन आणि स्वच्छ बेडशीट घालणे आवश्यक असते.पण आम्हाला घराची इज्जत ठेवायची आहे आणि आमच्या घराचा मन सन्मान वाढवायचा आहे.आम्ही त्यासाठीच काम करणारे लोक आहोत, असे रमेश बिधुरी म्हणाले.

Exit mobile version