अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजप त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले आहे. मात्र त्याच दरम्यान भाजप नेते मोहित कंबोज यांनी काल संध्याकाळी या आनंदाच्या भरात तलवार दाखवली. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित कंबोज यांनी काल संध्याकाळी त्यांच्या सांताक्रूझ निवासस्थानी कोविड नियमांचे उल्लंघन करून त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी केली होती.
काल मोहित कंबोज यांच्याकडून मलिकांच्या अटकेनंतर जल्लोष साजरा करण्यात येत होता. मोहित कंबोज यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यामुळे कंबोज यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच लोकांची गर्दी जमवत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ईडीने मलिक यांना अटक केल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी तलवार नाचवत आणि फटाके फोडत जल्लोष केला. शिवाय कंबोज यांनी तलवारही नाचवली होती.
बहुतेक कंबोज यांनी तलवार नाचवली म्हणून ठाकरे सरकार घाबरले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे असे कंबोज यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, ईडीने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.
हे ही वाचा:
नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी
‘नवाब मलिकांना एक क्षणही मंत्रीपदावर ठेवले जाऊ नये’
ईडी कार्यालयातून बाहेर येताना नवाब मलिक आनंदी का होते?
तामिळनाडू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाची जोरदार मुसंडी
आज महाविकास आघाडी आणि भाजपकडून आंदोलन करण्यात येणार आहे. नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मंत्री मंत्रालयाजवळ आंदोलनकरत आहेत. तर, मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे.