किरीट सोमय्या म्हणतात,आता पाचवा माणूसही तुरुंगात जाणार

किरीट सोमय्या म्हणतात,आता पाचवा माणूसही तुरुंगात जाणार

क्रांतिदिनाचं निमित्त साधून भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या हे दापोलीला जाणार आहेत. शिवसेनेचे नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई करण्याची मागणी किरीट सौमय्या करत आहेत. आता पाचवा व्यक्तीही तुरुंगात जाणार आहे, असे खळबळजनक विधान यावेळी किरीट सोमय्या यांनी केले आहे.

अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणी किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. अनिल परब यांचं ते बेकायदेशीर रिसॉर्ट तोडण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच किरीट सोमय्या हातोडा घेऊन गेले होते. आता पुन्हा येत्या ९ ऑगस्टला किरीट सोमय्या परबांच्या रिसॉर्टवर हातोडा घेऊन जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स

संजय राऊत यांची कोठडी ४ दिवस वाढली

टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

कर्माची फळं भोगणारे पार्थ चॅटर्जी खात असत अडीच लाखांची फळे

किरीट सोमय्या म्हणाले, ९ ऑगस्टला क्रांतिदिनी दापोलीला जाणार आहे. मुलुंडवरून दापोलीला जणार आहे. महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारी होते, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. मविआ सरकार सुपारी सरकार होतं, आता त्यांच्यातील पाचवा व्यक्तीही तुरुंगात जाणार असल्याचं किरीट सोमय्यांनी खुलासा केला आहे. मनी लाँड्रिंगचा पैसा दापोलीतील साई रिसॉर्ट साठी वळवला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
दापोलीतील साई रिसॉर्ट अनधिकृत बांधकाम प्रकरणी ईडीने अनिल परब यांना नोटीस पाठवली होती. यासंदर्भात ईडीकडून अनिल परबांची चौकशीसुद्धा करण्यात आली होती. पण ही चौकशी पूर्ण झाली नसल्याची ईडीचं म्हणणं आहे.

Exit mobile version