गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपाने १८२ पैकी १५६ जागांवर विजय मिळवला. आता भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री पदाची यांचा शपथविधी सोहळा ऐतिहासिक होणार आहे.
गुजरातमध्ये १९६२ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकांनंतर कोणत्याही पक्षाचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी १९८५ मध्ये काँग्रेसने १४९ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर आता भाजपाने १५६ जागा जिंकून विक्रम केला आहे.
भूपेंद्र पटेल १२ डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भूपेंद्र पटेल यांचा शपथविधी मेगा शो करण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपाचे सर्व बडे नेते सहभागी होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी या विजयला ऐतिहासिक विजय म्हटले आहे. ते म्हणाले, मी गुजरातच्या लोकांचे आभार मानतो. नरेंद्र मोदींबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. पंतप्रधान मोदींनी जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली. तसेच मी अमित शहा यांचे आभार मानतो, त्यांनी ३३ जाहीर सभा आणि रोड शो केले होते. या विजयाचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदींनी जाते असंही त्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा :
बुलेट ट्रेनसाठी खारफुटीची झाडे तोडण्यास न्यायालयाचा हिरवा कंदिल
रेल्वेचा कुली; पण गरिबांचा शिक्षक
इशान किशनने पाडला बांगलादेशमध्ये पाऊस, १२६ चेंडूंत २०० धावांचा विश्वविक्रम
तर भूपेंद्र पटेल यांनी म्हटले की, गुजरातचा निकाल स्पष्ट होता. गुजरातमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू, असा संकल्प आम्ही केला होता. रात्रंदिवस काम करून भाजपाला विजय मिळवून देणाऱ्या गुजरातच्या जनतेचे आणि पंतप्रधान मोदींचे भूपेंद्र पटेल यांनी आभार मानले.