‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट थिएटरमध्ये आल्यापासून या चित्रपटाविषयी विविध मतमतांतरे व्यक्त होऊ लागली आहेत. इतिहासातील घटनांचे वेगवेगळे संदर्भ समोर येऊ लागले आहेत. अशात नॅशनल कॉन्फरन्स या काश्मिरातील पक्षाचे तत्कालिन अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी १४ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८मध्ये लिहिलेला एक लेख समोर आला असून त्यात अब्दुल्ला यांनी काश्मिरातील पंडितांच्या अत्याचाराला, त्यांना १९९०मध्ये काश्मिरमधून हाकलून लावण्यास मुस्लिम जबाबदार आहेत.
ते लिहितात की, काश्मिरी पंडितांना पुन्हा खोऱ्यात परत आणण्यासाठी आम्ही प्राणांचेही बलिदान देऊ असे म्हणणे सोपे आहे. मी या भावनेचे स्वागत करतो आणि काश्मिरी पंडितही त्याचे स्वागत करतील. पण याच काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून हाकलून लावण्यासाठी मशिदींचा वापर करण्यात आला तेव्हा या भावना अस्तित्वात नव्हत्या.
ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर हा ब्लॉग लिहिला होता.
Dear @OmarAbdullah, is this true? pic.twitter.com/oMsvd6dJHo
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 18, 2022
त्यांनी लिहिले होते की, जेव्हा गरज होती तेव्हा आम्ही उभे राहिलो नाही. आम्ही कुणीही मशिदींमधील ते माईक हातात घेतले नाहीत आणि काश्मिरी पंडितांनाही या खोऱ्यात राहण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे बोलू शकलो नाही. आमचे सुशिक्षित नातेवाईक आणि शेजारी २४ तास विष ओकत होते पण आम्ही मूक प्रेक्षक बनून राहिलो. मशिदींबद्दल बोलायचे झाले तर ते उठावाचे केंद्र बनले. ९०च्या प्रारंभी याच मशिदींमध्ये लोकांना मोठ्या संख्येने बोलावून प्रार्थना करण्यास भाग पाडले जात असे. ‘भारतीयां’विरोधात उठावात सहभागी होण्यासाठी लोकांना घराघरातून बाहेर काढले जात होते. दुकाने हिरव्या आणि पांढऱ्या रंगाने रंगविली जात होती. घड्याळात पाकिस्तानी वेळ लावली जात होती. जणू काही हे केल्यामुळे काश्मिरच्या स्वातंत्र्याचे स्वप्न साकार होणार होते.
हे ही वाचा:
कोल्हापूरमधून जप्त केला २५ लाखांचा मद्यसाठा
रशियाने युक्रेनवर सहा क्षेपणास्त्रे डागली
युपीमध्ये रंग लावण्यावरून दोन गटांत हाणामारी, दोघांचा मृत्यू
लातूरमध्ये मुलीवर हल्ला करणाऱ्या गुंडाची पोलिसांनी काढली ‘परेड’
यासंदर्भात द काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट करून अब्दुल्ला यांनी असा लेख लिहिला होता का, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यावर हा लेख आऊटलूक मध्ये प्रसिद्ध झाला होता, पण नंतर तो त्यांच्या वेबसाईटवरून गायब झाल्याचेही काही नेटकऱ्यांनी म्हटले होते. पण काहींनी तो लेखही विवेक अग्निहोत्री यांना ट्विटरवर शेअर केला.