…म्हणून वृद्ध महिलेने आयुष्यभराची जमापुंजी केली राहुल गांधींच्या नावावर

…म्हणून वृद्ध महिलेने आयुष्यभराची जमापुंजी केली राहुल गांधींच्या नावावर

उत्तराखंड मधील एका वृद्ध महिलेने आपली आयुष्यभराची जमापुंजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावावर केली आहे. तिने राहुल गांधींना थेट आपले वारसदार बनवत सर्व मालमत्ता त्यांच्या नावे केली आहे.

पुष्पा मुंजीआल असे या महिलेचे नाव असून त्या उत्तराखंड मधील डेहराडून येथील रहिवासी आहेत. पुष्पा मुंजल ७० वर्षाच्या असून त्यांनी एकूण ५० लाख रुपयांची मालमत्ता आणि दहा तोळे सोने इतका ऐवज राहुल गांधींच्या नावे केला आहे. सोमवार ४ एप्रिल रोजी त्यांनी डेहराडून येथील जिल्हा सत्र न्यायालयात त्यांचे मृत्युपत्र सादर केले. यानुसार त्यांनी त्यांची सर्व मालमत्ता राहुल गांधी यांच्या नावावर केली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लालचंद शर्मा यांच्याकडे त्यांनी हे मृत्युपत्र सुपूर्त केले.

हे ही वाचा:

गोरखनाथ मंदिर हल्लेखोराचे इस्लामिक स्टेट, सिरियाशी कनेक्शन

करौली हिंसाचारप्रकरणी ४६ जणांना अटक; कर्फ्यू ७ एप्रिलपर्यंत वाढवला

मुख्यमंत्री भेटत नाहीत; शिवसेनेच्या खासदारांची तक्रार

केमिकल इंजीनियर अब्बासीने केला गोरखपूर मठाच्या सुरक्षा जवानांवर हल्ला

पुष्पा मुंजीआल या राहुल गांधी यांच्या कल्पनांनी प्रभावित झाल्या असून म्हणूनच त्यांनी आपली संपूर्ण मालमत्ता त्यांच्या नावे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी देखील देशसेवेसाठी स्वतःला झोकून दिले. यामुळे त्या प्रभावित झाल्या आहेत.

Exit mobile version