‘शिवीगाळ’-‘निलंबन’ ‘नाट्या’नंतर भास्कर जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

‘शिवीगाळ’-‘निलंबन’ ‘नाट्या’नंतर भास्कर जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

सोमवार, ५ जुलै रोजी महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला दिवस हा चांगलाच गाजला. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाच्या १२ आमदारांवर तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत त्यांचे निलंबन करण्यात आले. तर भाजपाने मात्र हे सारे आरोप फेटाळताना शिव्या देणारे कोण होते हे उपस्थित साऱ्यांनीच पहिल्याचे म्हटले आहे. भाजपाच्या एकही आमदाराने शिवी दिली नाही पण एक स्टोरी रचून त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे भाजपाने म्हटले आहे.

दरम्यान अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ नेमकी कोणी केली? यावरून दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज बघणाऱ्या भास्कर जाधव यांचे काही जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातल्या एका व्हिडिओमध्ये भास्कर जाधव गावातील एका मंदिरात हे गावकऱ्यांना शिवीगाळ करताना दिसत आहेत. या साऱ्या प्रसंगाचे व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या एका गावकर्‍याला त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचेही कळत आहे.

हे ही वाचा:
अधीर रंजन चौधरींना लोकसभेच्या नेतेपदावरून काँग्रेस हटवणार?

तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं

भास्कर जाधव यांनी विरोधकांना बोलूच दिले नाही

भास्कर जाधव यांची नार्को टेस्ट करा!

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भास्कर जाधव हे दारू विक्रीचे समर्थन करताना दिसत आहेत. दारू विकून पोट भरलं तर बिघडलं कुठे? असे भास्कर जाधव म्हणत आहेत. तर याच व्हिडिओमध्ये पुढे जाऊन ते ‘पोलीस हप्ता घेत नाहीत का?’ असे म्हणत पोलिस प्रशासनावरही सवाल उपस्थित करताना दिसत आहेत. हे दोन्ही व्हिडीओ २०२० सालच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातही असून यावरून आता भास्कर जाधव यांच्यावरच नेटकरी प्रश्न उपस्थित करताना आहेत.

Exit mobile version