हिमाचलमध्ये आजी म्हणाली, मोदी हमारा बच्चा है, उसने देश बचाया!

हिमाचलमध्ये आजी म्हणाली, मोदी हमारा बच्चा है, उसने देश बचाया!

हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६८ जागांसाठी आज मतदान होतं आहे. यावेळी मतदानासाठी आलेल्या एका आजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मी फक्त मोदींसाठी आली आहे, मोदीजींनी आम्हाला सगळं दिलं आहे. मोदीजींनी आमचा देश वाचवला आहे, असं त्या आजीने ठणकावून सांगितले आहे.

मालादेवी असं या आजीचे नाव असून, त्या जवळपास ८० वर्षच्या आहेत. या आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मी मोदींसाठी आली आहे. मी मोदींनाच मतदान करणार आहे, असं त्या म्हटल्या आहेत. जेव्हा त्यांना विचारलं मोदींनाच का मतदान करायचं आहे. तर त्या म्हटल्या, मोदीजींनी आम्हाला सगळं दिलं आहे. रेशन दिलं, मुलांना नोकरी दिली आहे विशेष म्हणजे आपला देश त्यांनी वाचवला आहे. आणखी काय द्यायला हवं असाही सवाल त्या आजींनी केला आहे. तसेच काँग्रेसने देशाची वाट लावली. काँग्रेसने देशाला चुकीच्या मार्गावर नेलं, असा आरोपही त्यांनी यावेळी काँग्रेसवर केला.

हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत मोदी जिंकणार असा ठाम विश्वासही त्या आजींनी व्यक्त केला आहे. माझं वय ८४ असूनही मी फक्त मोदीजींना मतदान करायला आली आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, १२ हजार रोजगार होणार निर्माण

‘या’ कारणामुळे ट्विटरच्या ‘ब्लू टिक’ पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे

आरेमध्ये बिबट्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला

गजानन कीर्तिकरांचा उद्धव गटाला रामराम ; शिंदे गटात सामील

दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये आज एकूण सात हजार ८८४ जागांवर मतदान होतं आहे. या निवडणुकीत ४१२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये एकूण ५५ लाख ९२ हजार ८२८ मतदार आहेत.

Exit mobile version