कोळी बांधवांच्या आंदोलनात आजींनी दिला इशारा
आम्हाला मुंबईतून बाहेर काढण्याचा कट केला जात आहे. माननीय उद्धव ठाकरेजी ही मुंबई कुणाची हे बघा. तुम्हीही बाहेरून आलात आणि इथे मुख्यमंत्री झालात. भूमिपुत्रांना बाजुला करू नका. जसे मनोहर जोशी यांनी आम्हाला हटविले, त्यांच्याबद्दल आम्हाला संताप व्यक्त करावासा वाटतो. राजकारण कशाला करत आहात. सावरकरांसारखे जगा, भगतसिंगांसारखे जगा. आम्ही शांततेने आंदोलन करतो आहोत. आमची अस्त्रे तुम्हाला ठाऊक आहेत. कोळी महिला या अबला नाहीत. सबला आहेत. झाशीच्या राणीप्रमाणेच आम्ही रणरागिणी होऊ, अशा खणखणीत शब्दांत कोळी समाजाच्या एका आजींनी ठाकरे सरकारला धारेवर धरले.
दादरचा मीनाताई ठाकरे मासळी बाजार बुलडोझरने तोडण्यात आल्यानंतर शुक्रवारी मच्छिमारांनी भाजपाच्या मच्छिमार सेलच्या माध्यमातून दादर येथे तीव्र आंदोलन केले. त्यावेळी या आजींनी दणदणीत भाषण करत उपस्थितांच्या रोषाला वाट मोकळी करून दिली.
दादर येथील मासळी बाजार पालिकेने हातोडा मारून तोडला आहे. तेथील कोळी बंधू भगिनींना नवी मुंबईत हलविण्यात येणार आहे. त्यामुळे कोळी समाजात प्रचंड संताप आहे.
हे ही वाचा:
न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूला अर्धांगवायूचा झटका
अजूनही शिवसेनेची संकुचित वृत्ती
खड्डे बुजविण्यासाठी हवी आहे ४ हजार कोटींची भर
भाजपाच्या मच्छिमार सेलने कोळी समाजासाठी दादरला आंदोलन केले. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर हेदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते. २५ ऑगस्टलाही कोळी समाजाने आंदोलन करून ठाकरे सरकारविरोधातील आपला राग व्यक्त केला होता.
What words,what pitch, what vibes, what spirit,what truth!
Lot to learn from this Aaji, seems like a leader from Koli Samaj, speaking directly from heart,emotions are so real,and so are the facts..
Thanks @CAPratikKarpe for introducing to this inspiration pic.twitter.com/BG8nKiaEkv— Nidhi Kamdar 🇮🇳 (@NidhiKamdarMH) August 27, 2021