टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी अटकसत्र सुरूच असून आता कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने खोडवेकर यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुशील खोडवेकर हे यापूर्वी शिक्षण विभागात कार्यरत होते. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी शनिवारी २९ जानेवारी रोजी दुपारी सुशील खोडवेकर यांना ठाण्यातून अटक केली. सुशील खोडवेकर हे २००९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते यापूर्वी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागात उपसचिव म्हणून कार्यरत होते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षा घोटाळा प्रकरणात तुकाराम सुपे यांच्या कार्यालयीन गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या सुनील घोलपसह मनोज डोंगरे यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. घोलप याने २०२० मधील शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अन्य आरोपींशी संगनमत करून अपात्र विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये घेतले. तुकाराम सुपे हे त्यांच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांची नावे, त्यांचे हॉल तिकीट घोलप याला देत असे. त्यानंतर घोलप ते अन्य साथीदाराला पाठवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
हे ही वाचा:
…म्हणून अफगाणिस्तानमध्ये वाढली ‘पुरुषां’ची संख्या
दादा काय सांगता…वाईन म्हणजे दारू नाही?
आश्चर्य!!! सहा महिने बेशुद्ध राहून कोरोनावर केली मात
‘सुपर मार्केटमधून दारू विकण्याऐवजी प्राथमिक सुविधा द्या’
या प्रकरणात वेगवेगळया ठिकाणाहून आतापर्यंत ४० आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामधील काही आरोपी हे म्हाडा, आरोग्य भरतीमध्येही सहभागी आहेत.