ईडीने बुधवार, ३ ऑगस्ट या दिवशी नॅशनल हेराल्ड प्रकरणी यंग इंडियाचे कार्यालय सील केले. यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नेहमीप्रमाणेच कांगावा करत मोदी सरकारवर टीका केली आहे. “आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना घाबरत नसून त्यांच्याविरोधात आमचा संघर्ष सुरू राहणार आहे,” असे सांगत राहुल गांधी या प्रकरणाला भावनिक केले आहे.
ईडीने काल यंग इंडियाचे कार्यालय सील केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी काँग्रेस मुख्यालय आणि सोनिया गांधी यांच्या निवासस्थानजवळ मोठ्या संख्येने पोलीस तैनात केले. यावर आज राहुल गांधी यांनी लोकशाहीच्या आणाभाका घेतल्या. “लोकशाहीच्या संरक्षणासाठी संघर्ष करत राहणार असून सरकारविरोधात लोकांच्या मुद्यावर आंदोलन करत राहणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
मोदी यांचे सरकार येण्यापूर्वी या प्रकरणी कारवाई सुरू झाली होती त्यामुळे आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका का करण्यात येत आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केंद्रीय यंत्रणांनी कारवाई केली की, लगेच लोकशाही धोक्यात असल्याची हाकाटी का पिटण्यात येते, असाही प्रश्न लोक विचारत आहेत.
हे ही वाचा:
संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स
संजय राऊत यांची कोठडी ४ दिवस वाढली
टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा
कर्माची फळं भोगणारे पार्थ चॅटर्जी खात असत अडीच लाखांची फळे
ईडीने दिल्लीतील विविध ठिकाणी मंगळवार, २ ऑगस्ट रोजी छापेमारी केली. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्ड मनीलॉन्डरिंग प्रकरणी चौकशी केल्यानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय उघडू नये, असे निर्देश ईडीने दिले आहेत. तसेच कार्यालय सील करण्यात आलं आहे.