मोदी सरकारला गेल्या ९ वर्षातील कामाचे १० पैकी आठ गुण

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केले कौतुक

मोदी सरकारला गेल्या ९ वर्षातील कामाचे १० पैकी आठ गुण

विरोधी पक्ष मोदी सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका करण्याच्या प्रयत्नात असताना विरोधी पक्षांमधील महत्त्वाचे नेते असणारे ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मोदी सरकारचे कौतुक केले आहे. परराष्ट्र रणनिती आणि भ्रष्टाचाराला मुळापासून हटवण्यासाठी मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले आहे.

 

 

ओदिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांनी रविवारी मोदी सरकारला १० पैकी आठ गुण दिले. ‘मोदी सरकारने परराष्ट्र नीती आणि अन्य मुद्द्यांबाबत जे काम केले आहे, त्यासाठी मी त्यांना १० पैकी आठ गुण देतो. मोदी सरकारमुळे भ्रष्टाचारही कमी झाला आहे. एका प्रसारमाध्यमाने दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या ओदिशा साहित्य महोत्सवातील परिसंवादात मुख्यमंत्री पटनाईक सहभागी झाले होते.

 

 

महिला आरक्षण विधेयकावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. माझ्या पक्षाने नेहमीच महिला सशक्तीकरणाला समर्थन दिले आहे. माझ्या वडिलांनी (माजी मुख्यमंत्री बीजू पटनायक) यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये ३३ टक्के आरक्षण दिले होते. ते मी वाढवून ५० टक्के केले होते,’ याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच, बीजेडीने सन २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ३३ टक्के जागी महिलांना उमेदवारी दिली होती, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या संकल्पनेचेही समर्थन केले. ‘मी नेहमीच याचे स्वागत केले आहे. आम्ही त्यासाठी तयार आहोत,’ असे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

भारतीय वायुदलात ‘सी-२९५’ वाहतूक विमान दाखल!

नरेंद्र मोदींनी बाईक बंद करायला सांगितली तरच करणार!

भारतीय महिला संघाची आशियाई स्पर्धेत श्रीलंकेला नमवत सुवर्णकामगिरी

किरीट सोमय्यांना कथित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

 

पटनायक यांना यावेळी केंद्र सरकारशी त्यांचे असणाऱ्या संबंधांबाबतही विचारण्यात आले. तेव्हा त्यांनी ‘केंद्र सरकारशी आमचे सौहार्दाचे संबंध आहेत. आम्हाला आमच्या राज्याचा विकास हवा आहे आणि या विकासात केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची आहे,’ असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version