25 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरराजकारणमुंबई महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण सोडत

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण सोडत

Google News Follow

Related

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज, २९ जुलैला आरक्षण सोडत जाहीर करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा ओबीसी आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आज ओबीस आरक्षणासाठीची सोडत जाहीर करण्यात येत आहे.

न्यायालयाच्या निर्देशानंतर आता एससी आणि एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता, यापूर्वी जाहीर करण्यात आलेले सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण रद्द करुन, नव्याने ओबीसी आणि महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे. आरक्षण सोडतमध्ये अनेक नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. यामध्ये विश्वनाथ महाडेश्वर, यशवंत जाधव आणि राखी जाधव यांचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लढण्यासाठी या दिग्गजांना दुसरे वॉर्ड शोधावे लागणार आहेत.

आज एससी, एसटी प्रवर्गाचे यापूर्वी घोषित झालेले आरक्षण वगळता २३६ पैकी २१९ प्रभागांची आरक्षण लॉटरी काढण्यात आली. त्यानंतर २१९ पैकी ६३ प्रभाग हे ओबीसी आरक्षित झाले आहेत. ६३ पैकी ५३ प्रभागात गेल्या तीन निवडणुकांमधे एकदाही ओबीसी आरक्षण आलेले नसल्याने नियमानुसार ५३ वॉर्ड ओबीसी आरक्षितच होणार आहेत. तर सर्वसाधारण १५७ प्रभागांपैकी ७७ प्रभाग महिला आरक्षित होणार आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात तपास करण्यासाठी सीबीआयला घ्यावी लागणार परवानगी

नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; सतर्क राहण्याचा इशारा

पोलिसांच्या जीर्ण झालेल्या घरांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी

ओबीसींसाठी आरक्षित असणाऱ्या वार्डमध्ये वॉर्ड क्रमांक ३, ७, ९, १२, १३, २७, ३०, ३८, ४०, ४२, ४८, ५१,५३,६२, ७६, ७९, ८१, ८७, ८९, १०१, ११०, ११७, १२८, १२९, १३२, १३५, १३७, १४६,१४७, १४८, १५०, १५२, १५४, १५५, १५९, १६१, १७४, १७९, १८०, १८३, १८५, १८८, १९५, २००, २०२, २०३, २१७, २१८, २२२, २२३, २३०, २३६ यांचा समावेश असणार आहे. या सर्व वार्डमध्ये मागील तीन निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नव्हते. तसेच यावेळी ओबीसी आरक्षणासाठी अन्य दहा वॉर्डसाठीदेखील लॉटरी काढण्यात आली. यात १७, ८२, ९६, ७३, १६, १२७, ९८, ६१, १७३, १३० या वॉर्डचा समावेश असणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा