26 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारणठाकरे सरकार विरुद्ध नाशिकमध्ये ओबीसी मोर्चा

ठाकरे सरकार विरुद्ध नाशिकमध्ये ओबीसी मोर्चा

Google News Follow

Related

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाशिकमध्ये समता परिषदेने रास्ता रोको करत आंदोलन केलं. द्वारका चौकात हे आंदोलन करण्यात आलं. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण वाचवा यासाठी आक्रोश आंदोलन करण्यात आलं. सध्या या आंदोलनासाठी स्वत: छगन भुजबळ हे रस्त्यावर उतरले नसले, तरी त्यांच्याच नेतृत्त्वात हे आंदोलन होत आहे.

ओबीसी आरक्षण वाचवा म्हणून आक्रोश आंदोलन हे केवळ नाशिकमध्ये नाही महाराष्ट्रभर होणार आहे काही ठिकाणी काल परवा सुरू पण झालेला आहे नाशिकला आहे बीड ला आहे ओबीसी समाज जो आहे हा देशभरातून प्रत्येक ठिकाणी आहे आणि त्यांना मिळालेला आरक्षण गेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष बाबासाहेब आंबेडकर असतानाचे मिळालं आणि त्या आरक्षणाला कायदेशीर रित्या काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले कोणीतरी कोर्टात गेलं को बीड सुरू होता त्याच्यामुळे काहीही करणं कठीण होतं.

हे ही वाचा :

सीबीएसईचे निकाल ३१ जुलै रोजी जाहीर होणार

रत्नागिरीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

उद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंड सरकार

तुमचा उद्धव मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे

मग या अशा परिस्थितीमध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये पूर्ण करणं अशक्य होतं परंतु आम्ही सगळे सांगून सुद्धा काही झालं नाही केलं पण नाही आणि म्हणून आरक्षण रद्द करण्यात आलं.. इम्पेरियल डाटा भारत सरकार कडे आहेत आम्ही आता मुख्यमंत्र्यांबरोबर आणि कायदेतज्ञ बरोबर ठरवू.. ओबीसीचे आंदोलन कोणाच्या विरुद्ध नाहीत आपलं दुःख आक्रोश प्रकट करण्यासाठी आहे, असं छगन भुजबळ यांनी माध्यमांना सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा