ठाकरे सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय

ठाकरे सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय

राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आमने सामने उभे ठाकलेले सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातली लढाई आता तुंबळ होताना दिसते आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शत प्रती शत ओबीसी उमेदवार देण्याचीच फडणवीसांनी काल घोषणा केलीय, त्यावर सत्ताधारी चेकमेट झाल्याचं चित्रं आहे. त्यातच आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी मंत्र्यांवर एकदम जळजळीत टिका केलीय.

पडळकर हे सांगलीतल्या झरेमध्ये बोलत होते. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवर यांच्यावर त्यांनी जहरी टिका केलीय. पडळकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेत्यांचं काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर झालंय. आणि ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय.जिथं ओबीसी मंत्र्यांच्याही शब्दाला मातीची किंमत नाहीये, तिथं सर्वसामान्य ओबीसींविषयी या प्रस्थापितांना किती आकस असेल. एकीकडे ओबीसी मंत्री म्हणतात “जो पर्यंत ओबीसी आरक्षण पुन्हा प्रस्थापित होणार नाही, तो पर्यंत आम्ही निवडणूक होऊ देणार नाही” पण दुसऱ्याच दिवशी निवडणूका जाहीर होतात. काय किंमत झालीये ओबीसी मंत्र्यांची? तुम्ही काय फक्त प्रस्थापितांना मुजरे घालण्यासाठी मंत्री झालात का? तुम्ही सत्तेसाठी ओबीसींचा आत्मसन्मानही विकला का? आता बास झालं. ओबीसी भटके विमुक्त बहुजन समाजाचा विश्वास घात करून निवडणूका घ्याल तर ओबीसी समाज दणका दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही ओबीसी बहुजनाच्या आक्रोशाची आग महाराष्ट्रभर पेटेल. आणि येत्या २६ तारखेला तुम्ही समस्त ओबीसी, भटके, बहुजन, अठरापगड बारा बलुतेदार समाजाची ताकद बघालच. तुमच्या गढ्यांना धक्का द्यायला आम्ही येतोय.

हे ही वाचा:

कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ

ऑनलाईन अध्यापनासाठी गुगलला अधिक पसंती

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीकडून अटक

वसई-विरारमधील बांधकाम माफियांना कुणाचा आशीर्वाद?

पाच जिल्हा परिषदा आणि त्यातल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वच्या सर्व जागांवर फक्त ओबीसी उमेदवारच देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्याची घोषणा फडणवीसांनी केलीय, त्यावर बोलताना पडळकर म्हणाले, ओबीसीं बांधवांसोबत दगाफटका करणाऱ्या आघाडी सरकारला देवेंद्र फडणवीसांनी चोख उत्तर देत. येणाऱ्या निवडणूकांमध्ये भाजपाच्या सर्वच जागांवर ओबीसी उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल समस्त ओबीसी बहुजन बांधवांतर्फे मी फडणवीसांचे आभार मानतो. मला विश्वास आहे या निर्णयाला समस्त बहुजन जनता साथ देईल.

Exit mobile version