21.9 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरराजकारणफडणवीसांच्या घरी ओबीसी नेत्यांची खलबतं

फडणवीसांच्या घरी ओबीसी नेत्यांची खलबतं

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजपामधील ओबीसी नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षणाबाबतची पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. या बैठकीला भाजपाचे बडे नेते उपस्थित आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलं आहे. राज्य सरकारने केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आलं आहे. या बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्याबाबतची रणनीती ठरविण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे आदी नेतेही उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा :

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पावसाचं संकट

अजित पवारांसमोर आरोग्य कर्मचाऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

एक लाख कोरोनायोद्धे तयार करणार

येडियुरप्पा- जयंत पाटील का भेटत आहेत?

एकीकडे फडणवीस यांच्या निवासस्थानी ओबीसी आरक्षणाबाबत पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक होत आहे. तर दुसरीकडे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींच्या चिंतन बैठकीचं आयोजन केलं आहे. लोणावळ्यात येत्या २६ आणि २७ जून रोजी चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय शिबिराचं राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उद्घाटन करणार आहेत. या शिबिराला पंकजा मुंडे, नाना पटोले आणि संजय राठोड यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं. ओबीसींना आरक्षण मिळावं, आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबतचं चिंतन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा