ओबीसींच्या हक्कासाठी २६ जूनला भाजपाचा चक्का जाम

ओबीसींच्या हक्कासाठी २६ जूनला भाजपाचा चक्का जाम

ओ.बी.सीं.च्या आरक्षणावर डाका टाकून ओबीसींना धोका देणा-या तिघाडी सरकारला जनता माफ करणार नाही. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी येत्या २६ जूनला भाजपा महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आमदार व माजी मंत्री संजयजी कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक पार पडली.

महाविकास आघाडी सरकारने दुर्लक्ष केल्याने व न्यायालयात योग्यरीत्या बाजू न मांडल्याने ओ.बी.सीं. चा हक्क मारला गेला. या सर्व मुद्द्यांवर चर्चा होवून २६ जूनचे आंदोलन दोन्ही जिल्ह्यांत यशस्वी करण्यासाठी ओ.बी.सी. बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खा.सुनील मेंढे यांनी केले.

हे ही वाचा:

वसई-विरारमधील बांधकाम माफियांना कुणाचा आशीर्वाद?

हाफिज सईदच्या घराबाहेर बॉम्ब स्फोट

मुख्यमंत्र्यांची आधी संमती, मग स्थगिती! आव्हाडांचा दावा

अरेरे! ७ वर्षांच्या मुलासह मातेने घेतली १२व्या मजल्यावरून उडी

या प्रसंगी संजय गाते प्रदेश सचिव ओबीसी आघाडी, शिवराम गीर्हेपुंजे जिल्हा अध्यक्ष भाजपा भंडारा, तारिकजी क़ुरेशी, शामजी झिंगरे ,उल्हासजी फडके राजेश बांते, चामेश्वर गहाणे, माजी आमदार चरण वाघमारे, माजी आमदार बाळा काशिवार, माजी आमदार रामचंद्र अवसरे, कोमलदादा गभने भाजप जिल्हा ओबीसी अध्यक्ष, सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी तसेच सर्व मंडल अध्यक्ष उपस्थित होते.

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही समस्या निर्माण होणार आहेत.

Exit mobile version