मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ण न केल्याने परिचारिका ‘दीन’

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पूर्ण न केल्याने परिचारिका ‘दीन’

१२ मे रोजी एकीकडे जगभर परिचारिका दिन साजरा होत असताना महाराष्ट्रात मात्र परिचारिकांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिचारिकांच्या मागण्यांसंदर्भात वर्षभरापूर्वी दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण न केल्यामुळे हे आंदोलन केले जात आहे. शिर्डी येथे या परिचारिका आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत.

गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळ जगभर कोरोना महामारी सुरु आहे. या काळात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांची खरी कसोटी होती. डॉक्टर्स, नर्सेस, इतर कर्मचारी हे अहोरात्र झपाटून रुग्णांवर उपचार करत आहेत. अशा परिस्थितीत अनेकदा डॉक्टर्सपेक्षा परिचारिकांवरची जबाबदारी अधिक असते. पण तरीही त्यांना त्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही.

हे ही वाचा:

बार मालकांप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दलही पत्र लिहा

मराठा आरक्षणाच्या नावावर सरकार एप्रिल फुल बनवत आहे- आशिष शेलार

दोन दिवसांच्या वेतन कपातीवर पोलीस दलाची नाराजी

राज्याच्या अधिकारातील सवलती तातडीने मराठा समाजाला द्या

यालाच धरून परिचारिकांनी समान काम, समान वेतन कुटुंबियांना मदत अशा विविध मागण्या सरकारकडे केल्या होत्या. यासाठी गेल्या वर्षी त्यांनी आंदोलनही केले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिचारिकांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. पण अजूनही परिचारिकांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे १२ मे, या जागतिक परिचारिका दिनीच राज्यातील परिचारिका रस्त्यावर उतरल्या आहेत.

पण तरीही राज्य सरकार परिचारिकांच्या मागण्या गांभीर्याने घेताना दिसत नाहीये, उलट परिचारिकांचे हे आंदोलन चिरडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिर्डीत आंदोलन करणाऱ्या परिचारिकांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे सरकारच्या विरोधात आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन करायची पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच नेस्को येथील कोरोना योध्यांनी प्रशासनच्या विरोधात संप पुकारला होता, तर मुंबई महापालिका निवासी डॉक्टरांची लूट करत असल्याचे आरोप डॉक्टरांनी केल्याच्या घटना ताज्या आहेत.

Exit mobile version