राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणात खुलासा
देशासाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात पहिल्यांदाच महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षण-५ ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, देशात आता १००० पुरुषांमागे १०२० महिला आहेत.
विशेष म्हणजे एकूण लोकसंख्येतील लिंग गुणोत्तर शहरांच्या तुलनेत खेड्यांमध्ये चांगले आहे. देशातील खेड्यांमध्ये १००० पुरुषांमागे १०३७ महिला आहेत, तर शहरी भागात ९८५ महिला आहेत. लोकसंख्येतील महिलांचे प्रमाण वाढले असले तरी त्यांच्या शिक्षणाच्या स्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही.
१९९० च्या दशकात प्रत्येक पुरुषामागे केवळ ९२७ महिला होत्या. २००५ -०६ मध्ये झालेला सर्वेक्षणात १००० – १००० ची बरोबरी झाली. त्यानंतर २०१५-१६ मध्ये ही आकडेवारी पुन्हा घसरली. १००० पुरुषांच्या तुलनेत ९९१ वर आकडा आला. पण आता पहिल्यांदाच महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त झाले आहे. यासोबतच जन्मावेळी लिंग गुणोत्तरामध्येही मोठी सुधारणा झाली आहे.
हे ही वाचा:
छत्रपतींच्या रायगडावर येणार राष्ट्रपती
I am श्रेयस अय्यर, हाफ सेंचुरीवाला
विरोधकांचा मारा थोपविण्यासाठी राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत
१ डिसेंबरपासून महाराष्ट्रात किलबिलाट
देशात प्रथमच प्रजनन दर २ वर आला आहे. २०१५-१६ मध्ये हा दर २.२ होता. विशेष बाब म्हणजे प्रजनन दर २.१ हे बदलाचे चिन्ह मानले जाते. म्हणजेच या दरानंतर देशाची लोकसंख्या स्थिर राहते. यापेक्षा कमी दर हे देशाच्या लोकसंख्येमध्ये घट झाल्याचे लक्षण मानले जाते.