दिल्लीच्या सीमेवर तिन कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनातील शेतकऱ्यांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होऊ लागली आहे. गेल्या चार महिन्यांपासून चालू असलेल्या या आंदोलनातील शेतकरी कापणी हंगाम सुरू झाल्याने गेले काही दिवस पुन्हा एकदा खेड्याकडे परतू लागला आहे.
सुमारे ४० शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन तयार केलेल्या संयुक्त किसान मोर्चा या संघटनेने यामुळे इतर राज्यात बोलावलेली महापंचायत रद्द केली आहे. त्याऐवजी त्यांनी आपले सर्व लक्ष दिल्लीच्या सीमेवर एकवटले आहे. याठिकाणी त्यांनी सोमवारी संपूर्ण दिवस होळीचा सण देखील साजरा केला होता.
हे ही वाचा:
राठोड, देशमुख यांच्यानंतर आव्हाडांचा नंबर?
औरंगाबादमधील लॉकडाऊन रद्द; इम्तियाज जलिल यांच्या मिरवणुकीत कोरोना नियमांचा फज्जा
संयुत किसान मोर्चाच्या एका नेत्याच्या मते सध्या उत्तर भारतात कापणी हंगाम सुरू आहे आणि त्यासाठी अधिक मनुष्यबळाची शेतांवर गरज आहे. एकदा हा हंगाम संपला की पुन्हा आंदोलक मोठ्या प्रमाणात गोळा होतील. पूर्वी विविध मार्गांवर १०-१२ आंदोलक दिसत होते, त्याच्या ऐवजी आता केवळ ३-५ आंदोलक दिसत आहेत.
गुरजुख सिंह या शेतकरी नेत्याच्या मते, आंदोलक कमी दिसण्याचं कारण म्हणजे अनेक वरिष्ठ नेते पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या विविध भागांत किसान महापंचायत घेत आहेत.
याऊल किसान संयुक्त मोर्चाचे नेते हरिंदर सिंग लाखोवाल यांच्यामते आत्ता आंदोलक कमी आहेत कारण आंदोलकांनी गावागावातील आंदोलनाचे वेळापत्रक पाळले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा एक संघ गावात पोहोचला की दुसरे दिल्लीकडे येतील.