दुराव्यानंतर पुन्हा अखिलेश यांचे काँग्रेसशी जुळले!

अखिलेश यादव यांनी केले स्पष्ट

दुराव्यानंतर पुन्हा अखिलेश यांचे काँग्रेसशी जुळले!

उत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे.काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची जागावाटपांमुळे युती तुटण्याची शक्यता होती.मात्र, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र असल्याचे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले आहे.यूपीमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.युतीची आणि जागावाटपाची लवकरच घोषणा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोमवारी (१९ फेब्रुवारी) रोजी रात्री उशिरा झालेल्या वाटाघाटीत मुरादाबाद विभागातील तीन महत्वाच्या जागांच्या वाटपावरून मतभेद झाल्याने ही युती तुटल्याचा बातम्या समोर आल्या होत्या.मात्र, या सर्व चर्चांना पूर्ण विराम देत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती असणार असणार आहे, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा..

कुर्ल्यात साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर

अनुष्का, विराटच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

राम मंदिरात दरमहा कोट्यवधी रुपयांची देणगी, मोजणीसाठी ‘हायटेक मशिन्स’चा वापर!

ते म्हणाले की, सपाचा काँग्रेससोबत कोणताही वाद नाही.जागांबाबत चर्चा सुरू होती, त्यावर परस्पर सामंजस्य करार झाला आहे. शेवट चांगला असेल तर सर्व चांगल होईल, असे अखिलेश यादव म्हणाले.ते पुढे म्हणाले की, दोघांची युती आहे.तुमच्या समोर लवकरच सर्व उघड होईल, असे अखिलेश यादव म्हणाले.दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीमध्ये आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसला १७ जागांची ऑफर देण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत अंतिम घोषणा होऊ शकते.

या आहेत १७ जागा
अंतिम कराराच्या आधारे, उत्तर प्रदेशात काँग्रेससाठी ज्या १७ जागा निश्चित केल्या जात आहेत. त्यामध्ये अमरोहा, झाशी, बुलंदशहर, रायबरेली, अमेठी, कानपूर, फतेहपूर सिकरी, बांसगाव, सहारनपूर, सीतापूर, प्रयागराज, महाराजगंज, वाराणसी, देवरिया, बाराबंकी, गाझियाबाद, मथुरा, या जागांचा समावेश आहे.

 

Exit mobile version