इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर

इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर

काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यांनतर काँग्रेसच्या अनेक पक्षबांधणीच्या सभा झाल्या. त्यादरम्यान, काँग्रेसने आता ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’च्या (आयओसी) कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. काँग्रेसला विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे.

राहुल गांधी हे लंडन दौऱ्यावर आहेत. त्यावेळी राहुल गांधींनी ‘इंडियन ओव्हरसीज काँग्रेस’च्या कार्यकर्त्यांशी सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधून दिला होता. त्यावेळी, काँग्रेसच्या इंग्लंडमधील कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे सोनिया गांधींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन दिले आहे.

इंग्लंडमधील इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची राहुल यांनी शनिवार, २१ मे रोजी भेट घेतली होती. यावेळी आयओसीचे इंग्लंडचे अध्यक्ष कमल धालिवाल यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राहुल यांना अध्यक्षपदाची सूत्रे घेण्याचे आवाहन केले आहे. त्यावेळी राहुल यांनी सोनिया गांधींशी कार्यकर्त्यांचा संपर्क साधून दिला आहे. सोनियांनी आगामी निवडणुकीत विजयासाठी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना खूप मेहनत घेण्यास सांगितली आहे.

हे ही वाचा:

जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…

मशिदींतून काढलेले भोंगे शाळा, रुग्णालयांना दान

‘१.५, २ रुपये इंधन दर कमी करणे ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा’

१० लाख आशाताईंचा WHO कडून सन्मान

या वेळी ‘आयओसी’च्या तेलंगणा समूहाचे सदस्य व प्रवक्ते सुधाकर गौड व सरचिटणीस गंपा वेणुगोपाल यांनी देखील सोनियांशी संवाद साधला आहे. त्या वेळी सोनियांनी तेलंगणमध्ये आगामी वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version