आता शिवसेनेची ‘ख्रिस्ती आघाडी’

आता शिवसेनेची ‘ख्रिस्ती आघाडी’

संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या, १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाला कारणीभूत असलेल्या, राम मंदिराला कायम विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसल्यामुळे आता हिंदू मतांची हमी नसलेली शिवसेना मतांसाठी अन्य धर्मियांना डोळा मारू लागली आहे. पण हे करताना त्यांनी माओवादी स्टॅन स्वामीचा आधार घेतला आहे.

जळगाव येथील शिवसेनेच्या ख्रिश्चन आघाडीने स्टॅन स्वामीच्या श्रद्धांजलीचे बॅनर झळकाविले असून त्याद्वारे ख्रिश्चन समाजाला खुश करण्याचा प्रयत्न चालविला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

ख्रिस्ती समाजातील देशभक्तांचे कौतुक करणारे बॅनर कधीही न झळकाविणाऱ्या शिवसेनेला स्टॅन स्वामीचा एवढा का पुळका आला, असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

हे ही वाचा:
… तर शनिवारी-रविवारीही दुकानं उघडी ठेवणार

एलआयसीचा आयपीओ डिसेंबर महिन्यापर्यंत?

केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्राला भीती नाही

विदर्भातील तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत

यासंदर्भात यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात ट्विट करून शिवसेनेच्या या बदलत्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हिंदू मत मिळणार नाही याची जनाबसेनेला खात्री झालेली दिसते. शिवसेनेची ख्रिस्ती आघाडी काढायला काहीच हरकत नाही, पण बॅनर पोस्टरवर माओवाद्यांच्या उदोउदो??? देशासाठी झिजणारे ख्रिस्ती नाही का सापडले यांना? कित्येक आहेत.

सामनाच्या अग्रलेखात माओवादी स्टॅन स्वामीच्या निधनाबद्दल परवा शिवसेनेने अश्रु ढाळले होते. त्यावरून शिवसेनेचे बदलते रूप सर्वांसमोर येऊ लागले आहे. आता या बॅनरबाजीमुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

जळगाव, शिवसेनेच्या ख्रिश्चन आघाडीचा हा बॅनर असून त्यावर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह ठाण्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, जळगावचे शिवसेना नेते सुरेश जैन यांचाही फोटो झळकत आहे.

गेल्या दीड वर्षांच्या काळात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यापासून अन्य धर्मियांकडून मतांचा जोगवा मागता यावा, यासाठी हातपाय मारायला प्रारंभ केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात उर्दू भाषा आणि संस्कृतीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी ठाकरे सरकार मार्फत पाच ‘उर्दू हाऊस’ उभारली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्याशिवाय, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी छेडानगर ते मानखुर्द या परिसरात सुमारे ७० टक्के लोकसंख्या ही मुस्लिम असल्यामुळे या उड्डाणपुलास सुफी संतांचे नाव देऊन मुस्लिम समाजाच्या भावनांचा सन्मान करावा, अशी मागणी केली होती. त्यावरून शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले होते.

Exit mobile version